Lalbaugcha Raja 2024  Saam tv
मुंबई/पुणे

Lalbaugcha Raja 2024 : पहिल्याच दिवशी धक्काबुकी, रेटारेटी; लालबागचा राजा मंडपातील घटना कॅमेरात कैद , पाहा VIDEO

Lalbaugcha Raja Crowd : लालबागचा राजा मंडळात पहिल्याच दिवशी धक्काबुकी, रेटारेटी पाहायला मिळवत आहे. लालबागचा राजा मंडपातील घटना कॅमेरात कैद झाली आहे.

Vishal Gangurde

मुंबई : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळ आहे. या गणेशोत्सव मंडळाला सेलेब्रिटी मंडळी झाडून हजेरी लावतात. तर सर्वसामान्य गणेशक्तांची देखील या गणेशोत्सव मंडळातील गणेशमूर्तीचं दर्शन घेण्यासाठी रिघ लागलेली असते. सकाळ असो रात्र या लालबागचा राजा मंडपात भाविकांची मोठी गर्दी दिसून येते. दरवर्षी लालबागचा राजा गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळात भाविकांची मोठी रिघ पाहायला मिळते. यंदाही तशी परिस्थिती दिसून येत आहे. या लालबागचा राजा मंडपातील तुफान गर्दीचा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जगभरातील गणेशभक्तांचे आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांची मोठी गर्दी उसळली आहे. यंदा लालबागचा राजाचा दरबार हा मयूर महालात आहे. लालबागचा राजा मयुरासनावर विराजमान झाला आहे. गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांनी रात्रीपासूनच रांगा लावल्या होत्या.

पहिल्या दिवसाच्या पहाटे लालबागच्या राजाची पारंपारिक विधिवत पद्धतीने पूजा करण्यात आली. त्यानंतर लालबागच्या राजाचे दर्शन गणेशभक्तांसाठी सुरू करण्यात आला आहे. लालगबागमधील हाच प्रसिद्ध गणपती पाहण्यासाठी भक्तांनी हजारोंची गर्दी केली आहे. या भीषण गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये काय दिसत आहे?

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडपात पहिल्याच दिवशी भाविकांची मोठी गर्दी दिसत आहे. महिला, पुरुष आणि लहान मुले या गर्दीत दिसत आहेत. लालबाग राजा मंडपात अचानक एक रांग दर्शनासाठी खुली करण्यात आली. त्यानंतर भाविकांची रिघ त्या दिशने निघाली. मात्र, ही गर्दी नियंत्रणात करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते उभे असल्याचे दिसत आहे. मात्र, या कार्यकर्त्यांना न जुमानता भाविकांची रिघ पुढे जात आहे. या भयानक गर्दीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं ९१ वे वर्ष आहे. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यानंतर चरण स्पर्शाची आणि मुख दर्शनाची रांग चालू झाली. गणेशोत्सवात पहिल्या दिवशी लालबागच्या राजाला गणेशभक्तांनी अर्पण केलेल्या दानाची मोजणी सुरु झाली आहे. सर्व लालबागचा राजाला गणेशभक्तांनी दान केलेल्या रोख रुपयांची मोजणी केली जाणार आहे. त्यानंतर लालबागचा राजाला गणेशभक्तांनी सोने आणि चांदीचे दागिने अर्पण केले आहे. त्याची मोजणी सुरु झाली आहे.

लालबागच्या राजाला पहिल्या दिवशी आलेलं दान

एकूण रक्कम - ४८ लाख ३० हजार रुपये

सोनं - २५५.८०० ग्रॅम

चांदी - ५०२४.००० ग्रॅम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

Maharashtra Politics: अजित पवारांच्या गटात बेशिस्तपणा वाढलाय; राष्ट्रवादीचा माजी आमदार भाजपात जाणार

Sunday Horoscope : तुम्ही यशाच्या अगदी जवळ जाणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार टर्निंग पॉईंट

Maharashtra Live News Update : दगडूशेठ गणपती मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट

SCROLL FOR NEXT