Ajit Pawar on Ladki Bahin Yojana  Saam Tv News
मुंबई/पुणे

Ladki Bahin Yojana : आदिवासींचा पैसा लाडकीनं पळवला, लाडकीमुळे महायुतीत खदखद; लाडकीचे लाड, इतरांना फटका?

Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याच्या निधीला हात लावला आहे.

Prashant Patil

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

मुंबई : राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा दहावा हफ्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असतानाच, महायुती सरकारची मात्र या योजनेला निधी मिळवताना चांगलीच दमछाक होत असल्याचे समोर आलं आहे. लाडकीच्या लाडापायी मागासवर्गीयांच्या निधीला कात्री लावण्यात आलीय. आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास खात्याच्या निधीला हात लावला आहे. त्यामुळे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी संताप व्यक्त केलाय.

कोणत्या खात्याला, किती फटका ?

सामाजिक न्याय विभागासाठी 3,960 कोटींची मंजूरी

सामाजिक न्याय विभागाचे 410 कोटी 30 लाख लाडकीसाठी वळवले

आदिवासी विकास खात्याला 3,420 कोटींची मंजूरी

आदिवासी विकास खात्याचे 335 कोटी 70 लाख लाडकीकडे वळवले

महिला व बालविकास विभागाकडे एकूण 746 कोटी वळवले

लाडकीवर वाद निर्माण झाल्यानं अखेर अर्थमंत्री अजित पवारांना स्पष्टीकरण द्यावं लागलयं. अजित पवारांनी कुठलाच निधी वळवला नसल्याचं सांगितलंय. मात्र मंत्री संजय शिरसाटांनी बालविकास विभागाला धारेवर धरत अर्थ विभाग मनमानी करत असल्याचा आरोप केल्यानं महायुतीतील खदखद समोर आली आहे. त्यामुळे यापुढेही लाडक्या बहिणीचे लाड महायुती सरकारला पुरवता येतील का? हा खरा प्रश्न.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI vs KKR: वानखेडे स्टेडियममध्ये भिडणार मुंबई इंडियन्स केकेआरचा संघ; जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन आणि पिच रिपोर्ट

Maharashtra Live News Update: छत्रपती संभाजी नगरमध्ये एलपीजी गॅससाठी तीन किलोमीटर रांग

Akshaye Khanna: ल्यारीचा बादशाहा होणार राक्षस गुरु शुक्राचार्य; 'महाकाली'मधला अक्षय खन्नाचा अंगावर काटा आणणारा लूक लीक

Snake Life: जंगलात साप किती वर्षे जगतात? तुम्हाला माहितीये का?

दिल्ली हादरली! आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय; भाच्याने मामाला संपवलं

SCROLL FOR NEXT