जयंत पवारांच्या जाण्याने आपण 'संवेदनशील लेखक, नाटककार गमावला'- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे SaamTV
मुंबई/पुणे

जयंत पवारांच्या जाण्याने आपण 'संवेदनशील लेखक, नाटककार गमावला'- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

परखड आणि निखळ नाटककार म्हणून त्यांनी आपला असा ठसा उमटवला. या क्षेत्राला त्यांची निश्चितच उणीव भासत राहील.

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : साहित्य अकादमी पुरस्कारविजेते साहित्यिक, नाटककार, तसेच जेष्ठ पत्रकार जयंत पवार यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शोक व्यक्त केला आहे. From Uddhav Thackeray To Jayant Pawar Tribute

हे देखील पहा-

जयंत पवार मराठी नाट्य क्षेत्रातील साक्षेपी आणि पत्रकारिता, साहित्य अशा क्षेत्रात निखळ तितकाच संवेदनशील विहार करणारे व्यक्तीमत्व गमावले आहे. मुंबईतील नजरेआड गेलेल्या गिरण्या, कष्टकरी त्यांची गिरणगाव संस्कृती पवार यांच्या मुळे शब्द रूपाने जीवंत आहे. परखड आणि निखळ नाटककार म्हणून त्यांनी आपला असा ठसा उमटवला. या क्षेत्राला त्यांची निश्चितच उणीव भासत राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारंनी देखील जयंत पवारांना श्रध्दांजली वाहिली आहे. "प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करणारा, दुर्बल-वंचिताचं जगणं नाटकातून, साहित्यातून जिवंत करणारा सिद्धहस्त लेखक, पुरोगामी, विद्रोही व्यक्तिमत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे," अशा शब्दात अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.

तसेच पवार यांच्या जाण्याने सर्वच पत्रकार आणि नाटककार क्षेत्रातील लोकांना आपल्यातून आपला आधारवड गेल्याची भावना निर्माण झाली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: आयुष्यात या ४ गोष्टी समजून घ्या, नाही तर तुमचं जगणं व्यर्थ, वाचा चाणक्यांची नीती

PM मोदींच्या रॅलीआधी मोठा राडा; टीएमसी-भाजपचे कार्यकर्ते भिडले, वाहनांवर दगडफेक

Kalyan Crime : 'मी माझ्या बायकोला मारून आलो'; हैवान नवऱ्यानं ९ वर्षांच्या मुलासमोरच बायकोचा जीव घेतला

Maharashtra Live News Update : पालकमंत्री प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा वरिष्ठांवर विश्वास

घरच्या घरी कसा बनवाल खुसखुशीत मालपुआ, पाहा अगदी सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT