भयंकर घटनेने पुणे हादरले! शुल्लक कारणावरून मित्राला पेट्रोल टाकून जाळले Saam Tv
मुंबई/पुणे

भयंकर घटनेने पुणे हादरले! शुल्लक कारणावरून मित्राला पेट्रोल टाकून जाळले

पुण्यातील धनकवडी परिसरामध्ये एका अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.

गोपाळ मोटघरे

पुणे: पुण्यातील (Pune) धनकवडी परिसरामध्ये एका अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शुल्लक कारणावरून मित्राने- मित्राला (friend) पेट्रोल (Petrol) अंगावर टाकून पेटवून दिल आहे. या दुर्घटनेत सुरज विजय मरळ हा 28 वर्षाचा युवक गंभीररित्या भाजून जखमी झाला आहे. धनकवडीच्या (Dhankawadi) स्मशानभूमी (Cemetery) परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे.

हे देखील पहा-

सुरज विजय मरळ हा घरून रेडिमेट कपडे विकण्याचे काम करतो. ७ तारखेला मध्यरात्री सुरज आपला मित्र गोविंदा उर्फ सत्येंद्र प्रमोद कुमार यादव यांच्या सोबत आयुष बियरबार या ठिकाणी दारू पिण्यासाठी गेला होता. दारू पिऊन झाल्यानंतर सुरज आणि गोविंदा धनकवडी जवळील स्मशानभूमी या ठिकाणी आपसात चर्चा करत होते. त्यादरम्यान झालेल्या शुल्लक वादातून आरोपी गोविंदा उर्फ सत्येंद्र प्रमोद कुमार यादव याने सुरज विजय मरळ याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिला आहे.

या घटनेत सुरज मरळ हा जवळपास तो ३० टक्के भाजला आहे. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात (hospital) उपचार करण्यात येत आहेत. या घटनेचे गांभीर्य पाहून सहकारनगर पोलिसांनी (police) सत्येंद्र प्रमोद कुमार यादव विरुद्ध खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक (Arrested) करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Whatsapp New Feature: फालतू मेसेजेसची चिंता संपणार, WhatsApp लवकरच आणत आहे नवीन फिचर, वाचा सविस्तर

Shocking News : मृत मुलगा जंगलात सापडला जिवंत! ३ महिन्यांनंतर कुटुंबासोबत भेट, नेमका काय प्रकार ?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Lucky zodiac signs: रविवारची त्रयोदशी ठरणार शुभ! ४ राशींना आर्थिक लाभ व मानसिक शांतीचे संकेत

IND VS AUS: रोहित-विराटचा फुसका बार, गिलही फ्लॉप; भारताची वाईट सुरूवात

SCROLL FOR NEXT