Mumbai Crime SaamTV
मुंबई/पुणे

Crime: धक्कादायक..'गांजा'साठी झालेल्या वादात मित्रालाच टेरेसवरुन फेकलं

या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना कुर्ला येथील दावल चाळ, रोशन मस्जिद जवळ घडली आहे.

सुरज सावंत

मुंबई: मुंबई मध्ये (Mumbai) गांजासाठी (Marijuana) मित्रालाच इमारतीच्या टेरेसवरुन खाली ढकलल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मुंबईच्या कुर्ला परिसरात घडली आहे.

या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव अमान उर्फ बिटू आफताब शेख (Aman Shaikh) (19) असे आहे. हे तरुण गांजा (Marijuana) पिण्यासाठी टेरेसवर गेले होते, यावेळी यांच्या गांजावरुन वाद झाला. वादात अमान याला मित्राने टेरेसवरुन खाली ढकलले यात त्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे.

ही घटना कुर्ला येथील दावल चाळ, रोशन मस्जिद जवळ घडली आहे. या प्रकरणी चुन्नाभट्टी पोलीस (Police) ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी मोहम्मद सुलतान अकबर अली खान याला पोलिसांनी अटक केली आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उल्हासनगरमधील शिवसेना-भाजपचा वाद पेटला; आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं, प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचलं

Maharashtra News Live Update: भंडाऱ्यात भरधाव दुचाकीला धडक देऊन एसटी बस शेतात शिरली; २५ प्रवासी किरकोळ जखमी

Vaidehi Parshurami: समुद्रकिनारी खुललं अभिनेत्रीचं सौदर्यं; वैदेही परशुरामीचा शिमरी गाऊनमध्ये ग्लॅमरल लूक व्हायरल

Alcohol Side Effects: दारू प्यायल्यानंतर व्यक्तीचं नियंत्रण का सुटतं?

घरी बोलवायचा, अश्लील भाषेत बोलायचा, स्टेशन मास्तरचा संतापजनक प्रकार; महिलेची मनसेकडे तक्रार अन् पुढे काय घडलं?

SCROLL FOR NEXT