Ambernath Crime अजय दुधाणे
मुंबई/पुणे

अंडापावच्या गाडीवर फ्रीस्टाईल हाणामारी; घटना सीसीटीव्हीत कैद...(पहा व्हिडिओ)

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अजय दुधाणे

अंबरनाथ: किरकोळ कारणावरून अंडा- पावच्या गाडीवर फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गायकवाड पाडा भागात हाणामारीची घटना घडली आहे. याठिकाणी राम पवार यांची अंडा- पावची गाडी आणि छोटं कँटीन आहे.

पहा व्हिडिओ-

या कॅन्टीनमध्ये फिर्यादी गुरुनाथ सावंत आणि रवी शिंदे हे दोघे रात्री ८ वाजेच्या सुमारास नाश्ता करण्यासाठी गेले होते. तिथे गुरुनाथ यांचा मामा शिवाजी देशमुख काम करतो. त्यामुळे गुरुनाथ याने मालक वेळेवर पगार देतो का? अशी विचारणा त्याच्या मामाला केली. त्याचा अंडापाव गाडीचालक राम पवार आणि त्याचा मुलगा दादासाहेब पवार यांना राग आल्यानं या दोघांनी गुरुनाथ आणि रवी शिंदे या दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

त्यामुळे या दोघांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. या हाणामारीचा हा सगळा प्रकार तिथल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आयपीसी ३२४, ३२४, ५०४ आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate News: खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी पडझड; भाव घसरल्याने बाजारात उलटफेर, 24K, 22K,18K तोळ्याची किंमत किती?

Heart health: रात्री उपाशी पोटी झोपल्याने हार्ट अटॅक येतो? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

धक्कादायक! पायाने तुडवलेला मैदा थेट ताटात? 'त्या' व्हायरल व्हिडिओने उडाली खळबळ; FDA प्रशासनावर संताप

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त

गोळ्या- औषधांचा खर्च वाचेल! रोज फक्त १ लवंग खाल्ल्याने शरीरात होतील ५ आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT