Wardha Crime Saam TV
मुंबई/पुणे

बड्या अभिनेत्यासोबाबत चित्रपटात काम देण्याचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक; दहिसर येथील घटना

तरुणी कडून दहा लाख उकळले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय गडदे

मुंबई - उपनगरातील दहिसर परिसरात राहणाऱ्या 21 वर्षीय तरुणीला अभिनेता रजनीकांत यांच्या सोबत चित्रपटात रोल देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात तरुणीने दहिसर पोलीस (Police) स्टेशन मध्ये दोन जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मुंबईच्या (Mumbai) दहिसर भागात राहणाऱ्या या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलीला चित्रपटात काम करण्याची हौस होती यासाठी तुमचे प्रयत्न देखील सुरू होते अशाच प्रयत्नातून तिची ओळख पियू जैन आणि मंथन रूपारेल यांच्याबरोबर झाली. फिर्यादी तरुणीला या दोन्ही आरोपींनी हैदराबादच्या वेंकटेश्वरा क्रिएशन निर्मित आरसी १५ आणि जेलर अशा दोन चित्रपटात रजनीकांत सोबत काम करण्यास संधी देण्याचे कबूल केले.

या दोन चित्रपटातील भूमिकांसाठी पासपोर्ट, फॉरेक्स कार्ड गव्हर्मेंट कडून मिळणाऱ्या परमिशन या सर्वांच्या नावाखाली आरोपींनी तरुणीकडून दहा लाख 31 हजार 636 रुपये उकळले होते. मात्र अनेक दिवस उलटून गेल्यानंतर चित्रपटात काम करण्याची संधी देखील मिळाली नाही व पैसे देखील परत मिळत नव्हते यामुळे फसवणुकीची भावना झाल्यानंतर तरुणीने दहिसर पोलीस स्टेशन मध्ये या दोघांविरोधात तक्रार दाखल केली. दहिसर पोलिसांकडून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Free Sweet Recipes : गोड खाण्याची इच्छा होतेय? झटपट बनवा 'हा' शुगर फ्री हलवा, मधुमेही रूग्णही आवडीने खातील

Vastu Shastra: पैशाची चणचण, जीवनात अडी-अडचण येतेय? अंथरुणातील 'ही' चूक बदलतेय तुमची ग्रह दशा

गुजरातमध्ये पैशांचा पाऊस, पोती भरून भरून उधळल्या गायकावर नोटा, VIDEO व्हायरल

महिलांच्या 'या' भागावर तीळ म्हणजे नवऱ्यासाठी भाग्यवान, नशिब बदलतं

Maharashtra News Live Update: यवतमाळचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची नागपूर येथे बदली

SCROLL FOR NEXT