Mumbai Saam Tv
मुंबई/पुणे

क्रिप्टो करन्सी गुंतवणुकीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

गुंतवणूकदारांमध्ये पोलीस, डॉक्टर, सनदी लेखापाल यांचा समावेश

सुरज सावंत

मुंबई - बक्सकॉईन आभासी चलनात गुंतवणुकीच्या नावाखाली बिटसोलाईव्हज या कंपनीने ३६७ गुंतवणूकदारांची ३ कोटींहून अधिक रुपयांना फसवणूक करणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुंतवणूकदारांमध्ये पोलीस, डॉक्टर, सनदी लेखापाल यांचा समावेश आहे. या प्रकरणी निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार पंतनगर पोलिसांत बिटसोलाईव्हज या कंपनीच्या गणेश सागर, प्रशांत ब्रह्मभट्ट, चंद्रशेखर बाली, अनुज ओझा आणि मोहसीन जमील या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा -

या कंपनीच्या एका संचालकाला गेल्या आठवड्यात पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली होती. मुंबई पोलीस लवकरच त्याचा ताबा घेणार आहेत. कंपनीच्या संचालकांनी काही दिवसांपूर्वी बैठका आणि सेमिनार आयोजित केले होते. यावेळी गुंतवणूकदारांना आभासी चलनाच्या गुंतवणुकीत फायदा मिळण्याचे आमीष दाखवून त्यांना पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले.

तसेच गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले आणि यात इतर नागरिकांन जोडले तर त्याचा स्वतंत्र नफा गुंतवणूकदारांना देणार असल्याचे सांगितले. २० महिन्यांनंतर नफ्याचे पैसे काढण्याची परवानगी होती. परंतु हा कालावधी संपल्यानंतरही गुंतवणूकदारांना नफा किंवा त्यांनी गुंतवलेली रक्कम मिळाली नाही. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Wear Mangalsutra: डेली वेअरसाठी छोटे, नाजूक मंगळसूत्र, हे आहेत ट्रेडिंग 5 पॅटर्न

कुत्र्यासोबत अनैसर्गिक कृत्य; विकृत घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

बीडमध्ये पुन्हा खळबळ; लॉजमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू

लोकलच्या डब्याला लागली आग; प्रवाशांची उडाली धावपळ, VIDEO

PAK vs NZ: सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात पावसाची फटकेबाजी; सामना रद्द, कोणत्या संघाच्या स्वप्नावर फेरलं पाणी?

SCROLL FOR NEXT