four students of mgm kamothe dental college booked for ragging junior.  saam tv
मुंबई/पुणे

Ragging : दारू पाजून पॅन्टीत लघुशंका करायला पाडलं भाग; चाैघा विद्यार्थ्यांवर कारवाई (व्हिडीओ पाहा)

दरम्यान कॉलेजच्या अँटी रॅगिंग समितीच्या एका प्राध्यापकाने तक्रार केल्यानंतर कामोठे पोलिसांनी चार विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai : नवी मुंबईतील (navi mumbai) कामोठे येथील डेंटल कॉलेजच्या चार जणांनी ज्युनिअर विद्यार्थ्यांवर (students) रॅगिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. कॉलेजने पाेलिसांत नोंदवलेल्या तक्रारीनुसार चौघांनी युवकास (youth) दारू प्यायला लावले आणि त्याच्या पँटमध्ये लघवी करण्याचा आग्रह धरला असे नमूद केले आहे. या महाविद्यालयाने संबंधित चारही विद्यार्थ्यांना निलंबित केले आहे.

ही घटना जुलैमध्ये घडली होती. परंतु पीडित मुलाने आपल्यासोबत झालेल्या छळाची माहिती पालकांना आत्ता दिली. पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत असलेला विद्यार्थी कामोठे येथे आपल्या तीन मित्रांसह राहत होता. याच ठिकाणी दुसऱ्या फ्लॅटवर तिसऱ्या वर्षात शिकत असेलेले विद्यार्थी राहत होते.

चारही विदयार्थी यांनी पीडित विद्यार्थी आणि त्याच्या साथीदारांना त्यांच्या जागेवर येण्यास सांगत त्यांना दारू पिण्यास भाग पाडले. यावेळी पीडित तरुणाला लघवीला आली असता चार वरिष्ठ विद्यार्थ्यांनी त्याला लघवी करण्यापासून रोखत त्याला अधिक पाणी पिऊन लघवी रोखून धरण्यास सांगितले. त्यानंतर वरिष्ठ विद्यार्थी यांनी त्याच्याकडे पॅन्टमध्ये लघवी करण्याचा आग्रह धरला असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान कॉलेजच्या अँटी रॅगिंग समितीच्या एका प्राध्यापकाने तक्रार केल्यानंतर कामोठे पोलिसांनी चार विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT