Mumbai Building collapsed  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Building Collapsed : मुंबईत ४ मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली, पाहा थरारक व्हिडिओ

मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे.

Satish Daud

सूरज सावंत, साम टिव्ही

Mumbai Building collapsed : मुंबईत (Mumbai) धक्कादायक घटना घडली आहे. मुंबई उपनगरातील बोरिवलीमध्ये आज चार मजली इमारत (Building Collapsed) कोसळली. बोरिवली पश्चिमेतील साईबाबा नगरमध्ये ही घटना घडली. अग्निशमन दलाने ही माहिती दिली. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून, बचाव आणि मदतकार्य तातडीने सुरू करण्यात आले आहे. (Four Storey Building Collapsed In Saibaba Nagar Borivali West in Mumbai)

मुंबईतील बोरिवली पश्चिमेकडील साईबाबा नगर परिसरात गीतांजली नावाची चार मजली इमारत आहे. ही इमारत काही वेळापूर्वी कोसळली. या दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये १२ ते १५ रहिवासी अडकल्याची प्राथमिक माहिती मिळते. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने बचाव आणि मदतकार्य सुरू केले आहे. दरम्यान, या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बोरिवली परिसरातील गीतांजली ही तळ अधिक चार मजली इमारत कोसळल्याची माहिती अग्निशमन दलाला दुपारी साडेबाराच्या सुमारास मिळाली. त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस आणि वार्डातील कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचावकार्य आणि मदतकार्य हाती घेतले. या इमारतीत १२ ते १५ जण अडकल्याची माहिती मिळते. अद्याप या दुर्घटनेत कुणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

SCROLL FOR NEXT