sanjay pandey saam tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीकडून अटक

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज कॉ-लोकेशन घोटाळा केल्याप्रकरणी ईडीने ही अटक केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कॉ-लोकेशन घोटाळा केल्याप्रकरणी ईडीने ही अटक केली आहे. ( Sanjay Pandey Arrested)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना आज ईडीकडून (ED) चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. ईडीच्या चौकशीत नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या कर्मचाऱ्यांचे फोन हे बेकायदेशीरपणे टॅप केल्याचं समोर आलं होतं. विशेष म्हणजे १९९७ पासून हे फोन बेकायदेशीररित्या टॅप केले जात असल्याचा आरोप पांडे यांच्यावर होता. या प्रकरणाची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरू होती. पांडे हे चौकशीत सहकार्य करत नसल्याची तक्रार ईडीने दिल्लीत कोर्टात सांगितली होती. दरम्यान, आज मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pandey) यांना ईडीने अटक केली आहे.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजप नेते किरीट सौमय्या (kirit somaiya) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सोमय्या म्हणाले, 'अखेर महाविकास आघाडीचे माफीया पोलीस आयुक्त संजय पांडे यांची तुरुंगात रवानगी झाली. जैसी करणी,वैसी भरणी. ज्या पद्धतीने संजय पांडे यांनी पोलीसराज आणि माफीयाराज चालवलं होतं. त्यांना आता नॅशनल स्टॉक एक्सचेंज कॉ-लोकेशन घोटाळा , नॅशनल स्टॉक एक्सचेंज कर्मचाऱ्यांचे बेकायदेशीर फोन टॅप केल्याप्रकरणी ईडीने अटक केली आहे. त्यामुळे मी भारत सरकारचे अभिनंदन करतो'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime News : दिवसाढवळ्या गोळीबार, पुण्यातील पाटस हादरलं; दोन गटांतील वादानंतर तुफान हाणामारी

हृदयद्रावक! सर्पदंशाने ३ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; कुटुंबीयांनी सापच आणला रुग्णालयात

Chanakya Niti : चाणक्यांच्या या 6 सायलेन्स स्टॅटर्जी शत्रूला करतील कमजोर

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील पेडी नदी पुलावर भीषण अपघात

Pimpari-Chinchwad: पिंपरी-चिंचवडकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, १४ दिवसांसाठी जमावबंदी; काय सुरू अन् काय बंद?

SCROLL FOR NEXT