Manikrao Kokate Saam tv
मुंबई/पुणे

तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की झटका? कोर्टात काय घडलं?

Manikrao kokate News : माजी मंत्री माणिकराव कोकाटेंना दिलासा मिळालाय. त्यांना १ लाखांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.

Vishal Gangurde

माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाकडून दिलासा

कोकाटे यांना १ लाखांचा जामीन मंजूर

कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती नाही

माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. कोकाटे यांना कोर्टाकडून १ लाखांचा जामीन मंजूर झाली आहे. कोर्टाने जामीन मंजूर झाल्याने त्यांची तात्पुरती अटक टळली आहे. हायकोर्टाच्या निकालानुसार कोकाटे यांना २ वर्षांची जेल होणार नाही,अशी माहिती हाती आली आहे. त्यामुळे कोकाटे यांना आज तात्पुरती दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.

माजी मंत्री कोकाटे यांना आज शुक्रवारी एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आल्याने त्यांना अटक होणार नाही. त्यामुळे लिलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोकाटे यांच्यासाठी दिलासा मानला जातोय. मुंबई हायकोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीशांनी हा महत्वपूर्ण निकाल दिलाय.

कोकाटेंना जामीन मंजूर, पोलीस काय भूमिका घेणार?

सदनिका घोटाळा प्रकरणा नाशिक पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागलं होतं. मात्र, कोकाटे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. कोकाटे यांना दिलासा मिळाल्याने नाशिक पोलीस काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हायकोर्टाकडून माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर केल्यामुळे आता नाशिक पोलीस परत जाणार आहेत. मात्र, काही तांत्रिक बाबींची पूर्तता करून पोलीस नाशिकला परत जाणार आहेत.

हायकोर्टात काय घडलं?

मुंबई हायकोर्टात कोकाटेंच्या याचिकेवर दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला. यावेळी सदनिका घोटाळा प्रकरणात कोकाटे आर्थिक मुद्द्यावरून सदनिकेसाठी पात्र होते, असा युक्तिवाद ॲड. रवींद्र कदम आणि ॲड. अनिकेत निकम यांनी केला होता. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर निकालाचं वाचन झालं. यावेळी लिलावती रुग्णालयात अँजिओग्राफी झालेल्या कोकाटे यांना दिलासा मिळाला. त्यांना १ लाखांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर झाला. तर त्यांची या प्रकरणात आमदारकी देखील जाणार नाही. आमदारकी रद्द करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, असं कोर्टाने म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अरविंद म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेतेचा राजीनामा दिला

Pune : पाळीव कुत्रा चावल्यामुळे मालकासह तिघांवर गुन्हा, पुण्यात नेमकं घडलं काय?

Street Food : स्ट्रीट फूडच्या नावाखाली विषाची विक्री, FDAचा नाही मेळ, जनतेच्या जीवाशी खेळ

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा १८, २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

RBI Repo Rate : लोन महागणार की स्वस्त? तुमच्या EMI वर काय फरक पडणार? जाणून घ्या RBI गव्हर्नरांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT