Anil Parab News  Saam Tv
मुंबई/पुणे

Anil Parab : माझा काय संबंध? ED कारवाईच्या दाव्यानंतर सोमय्यांना परबांचं रोखठोक उत्तर

ईडीने कारवाई केलेल्या रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही, असा खुलासा अनिल परब यांनी केला आहे

साम टिव्ही ब्युरो

Anil Parab News : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केल्याचा दावा केला आहे. किरीट सोमय्या यांच्या दाव्यानंतर आमदार अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ईडीने कारवाई केलेल्या रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही, असा खुलासा अनिल परब यांनी केला आहे. (Latest Marathi News)

किरीट सोमय्यांच्या ED कारवाईच्या दाव्यानंतर अनिल परब म्हणाले, 'सुरुवातीपासून मी सांगत होतो, या रिसॉर्टशी माझा काही संबंध नाही. आज इडीची संपत्ती जप्त केली आहे , त्या संपत्तीचे मालक सदानंद परब आहेत. या प्रॉपर्टीशी माझा काहीही संबंध नाही. बदनामी करायची यामागे हा उद्देश आहे'.

'आता कारवाई झाली आहे, तर सदानंद परत हे मालक आहेत ते योग्य ती कायदेशीर कारवाई करतील. किरीट सोमय्या न्यायाधीश नाहीत. मी त्यांना उत्तर द्यायला बांधील नाही.मला ज्या तपास यंत्रणा प्रश्न विचारतील. त्यांना उत्तर देणे मी बंधनकारक आहे आणि त्याचे उत्तर मी देईन, असे अनिल परब यांनी स्पष्टीकरण केले.

'माझी बदनामी झाली, याची कोर्टात जाऊन मी न्याय मागेन. दोन वर्षापासून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सोमय्या काय म्हणतात याचा आमच्याशी संबंध नाही. जे काय म्हणायचे ते आम्ही कोर्टात बोलू, असे अनिल परब पुढे म्हणाले.

किरीट सोमय्या काय म्हणाले होते?

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी याबद्दल पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या मोठ्या कारवाईनंतर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती. "अनिल परब यांची संपत्ती जप्त झाली आहे, आधी संंपत्ती आता लवकरच परबही जप्त होतील," अशा शब्दात सोमय्या यांनी हल्ला चढवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्री मुरलीधर मोहोळ घेणार भाजपच्या नगरसेवकांची ‘शाळा’

Pune : गुरुवारी पुण्यात पाणीबाणी!  शहराचा पाणीपुरवठा २४ तास बंद; 'या' भागांना बसणार फटका

Kunbi Nondi : कुणबी नोंदी जिल्ह्याच्या संकेतस्थळावर; ग्रामपंचायत फलकावर याद्या लावण्याचे उपसमितीचे आदेश

Dogs crying at night: कुत्रे अचानक रात्रीच्या वेळेसच का रडतात?

Maharashtra : महाराष्ट्रातील 'ही' ५ शहरे सौंदर्यासाठी जगभरात प्रसिद्ध, इथे फिरला नाहीत तर काय मजा!

SCROLL FOR NEXT