Deepak Sawant  Saam Tv
मुंबई/पुणे

Deepak Sawant Car Accident : मोठी बातमी! माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या कारला अपघात; पालघरला जाताना घडली दुर्घटना

माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

सूरज सावंत

Deepak Sawant News : माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या कारला अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. सावंत यांच्या कारला डंपरने धडक दिल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात दीपक सावंत गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णवाहिकेने अंधेरीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गटाचे नेते, माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या कारला अपघात झाल्याची घटना घडली आहे. डॉ. दीपक सावंत (Deepak Sawant) यांच्या कारला डंपरनं धडक दिल्याने मोठा अपघात घडला आहे.

शुक्रवारी सकाळी पालघरला (Palghar) जाताना अपघात घडला आहे. काशिमीरा भागात सावंत यांच्या कारला अपघात झाला आहे. या अपघातात डॉ. दीपक सावंत यांच्या मानेला आणि पाठीला दुखापत झाली आहे.

या अपघातात डॉ. दीपक सावंत यांच्या कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात जखमी झाल्यानंतर डॉ. दीपक सावंत यांना रुग्णवाहिकेने अंधेरीच्या रुग्णालयात दाखल केले आहे. दीपक सावंत यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कसा झाला अपघात ?

माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे आज सकाळी कारने पालघरला निघाले होते. त्यावेळी अचानक सावंत यांच्या कारला डंपरने धडक दिली. सावंत यांच्या कारला काशिमीरा भागात त्यांच्या कारला अपघात झाला.

या अपघातात डॉ. दीपक सावंत यांच्या मानेला आणि पाठीला मोठी दुखापत झाली. त्याचबरोबर कारचेही मोठे नुकसान झाले. अपघातात जखमी झालेल्या डॉ. दीपक सावंत यांना अंधेरी येथे रुग्णवाहिकेने दाखल केले. सध्या त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT