Illegal Liquor Seized सचिन जाधव
मुंबई/पुणे

Crime News: राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; पुण्यात ८७ लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त

Illegal Liquor Seized: पुणे विभागाने धडक कारवाई करत ८७ लाखांचा हा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वृत्तसंस्था

Illegal Liquor Seized: पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागाने ८७ लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटकही करण्यात आली आहे. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, गोवा राज्यात बनवलेली आणि गोवा राज्यात विक्रीकरीता असलेला हा विदेशी मद्यसाठा होता. राज्य उत्पादन शुल्क (Maharashtra State Excise Department) पुणे विभागाने धडक कारवाई करत ८७ लाखांचा हा विदेशी मद्यसाठा (Liquor) जप्त केला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रवीण परमेश्वर पवार वय २४ वर्षे, रा. मु.पो. तांबोळे ता. मोहोळ जि. सोलापूर आणि देविदास विकास भोसले वय-२९ वर्षे रा. मु.पो खवणी ता.मोहोळ जि. सोलापूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या दोघांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ) (ई), ८१, ८३, ९०, १०३ व १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात त्यांना अटक करण्यात आली आहे.

यात एक ट्रक ड्रायव्हर आणि क्लिनर आहे. यांची तपासणी केली असता ट्रकमध्ये मोठ विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात रिअल व्हिस्की ७५० मि.ली चे ४१६४ सीलबंद बाटल्या आणि रिअल व्हिस्की १८० मि.ली चे ५७६० सीलबंद बाटल्या आढळल्या. तसेच रॉयल ब्ल्यू व्हिस्की ७५० मि.ली चे ९६०० सीलबंद बाटल्या असे विदेशी मद्याचे एकुण १२६७ बॉक्स आढळले आहेत. या जप्त केलेल्या मद्याची किंमत अंदाजे, ८७,८९,५२० रुपये एवढी आहे. तसेच वाहनासह इतर जप्त मुद्देमालाची किंमत अंदाजे १,०५,०७,५२० रुपये इतकी आहे. याप्रकरणी पुढील कारवाई करण्यात येत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT