Mumbai: चुकीच्या उपचारांतून पाच जणांचा बळी, बोगस देवमाणसाचा कारनामा SaamTv
मुंबई/पुणे

Mumbai: चुकीच्या उपचारांतून पाच जणांचा बळी, बोगस देवमाणसाचा कारनामा

धसई प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये शिपाई म्हणून काम करत असताना आणि निवृत्त झाल्यावर देखील स्वत:ला डॉक्टर म्हणवून घेत घरीच दवाखाना थाटणाऱ्या पांडुरंग घोलप या बोगस डॉक्टरचा टोकावडे पोलिसांनी पर्दाफाश केला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: धसई प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये (Health Center) शिपाई म्हणून काम करत असताना आणि निवृत्त झाल्यावर देखील स्वत:ला डॉक्टर म्हणवून घेत घरीच दवाखाना (Hospital) थाटणाऱ्या पांडुरंग घोलप या बोगस डॉक्टरचा टोकावडे पोलिसांनी (police) पर्दाफाश केला आहेे. त्याच्या चुकीच्या उपचारांतून ५ निष्पापांचे बळी घेतले असून या बोगस डॉक्टरविरोधामध्ये टोकावडे पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याला गुरुवारी दुपारी अटक (Arrested) करण्यात आली आहे.

हे देखील पहा-

धसई प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेली अनेक वर्षे घोलप शिपाई म्हणून कार्यरत होता. घोलप सेवेत असताना देखील त्याने घरीच दवाखाना थाटला होता. तो स्वत:ला डाॅक्टर म्हणून घेत गोरगरिबांवर उपचार करत असत. सेवेतून निवृत्त झाल्यानंतर देखील त्याने घरातून (home) उपचार सुरू ठेवले होते. परिसरामधील अनेक जण या बोगस डाॅक्टरवर विश्वास ठेवून त्याच्याकडून उपचार करून घेत असत. २४ आणि २६ जानेवारी रोजी धसई (Dhasai) येथील बारकूबाई वाघ, चिखलीवाडी (धसई) येथील आशा नाईक या आदिवासी महिलांवर घोलप याने चुकीचे उपचार केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.

तसेच राम भिवा आसवले (रा.मिल्हे), आलका मुकणे (रा.मिल्हे), लक्ष्मण मोरे (रा.पळू), यांच्यावर देखील चुकीच्या पद्धतीने उपचार झाल्यामुळे या तिघांचा मृत्यू झाला आहे. या डॉक्टरविरोधामध्ये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस हवालदार नितीन घाग यांनी यावेळी दिली आहे. २ दिवसांपासून फरार असलेल्या घोलपला गुरुवारी अटक करण्यात आली आहे. तर या बोगस डाॅक्टरने उपचार केलेल्या अन्य रुग्णांची चौकशी सुरू असल्याचे तालुका आरोग्य विभागाने सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sooryavansham : 'सूर्यवंशम' मधील हीरा ठाकुरचा मुलगा आता कसा दिसतोय? इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव, पाहा फोटो

Gas Shortage: गॅस सिलिंडरसाठी राज्य सरकारची नवी नियमाली; फडणवीस सरकारनं नेमका काय घेतला निर्णय?

Maharashtra Live News Update : पुण्यात भरधाव कार ८० फूट दरीत कोसळली

LPG Cylinder Price: तुमच्या शहरात LPG गॅस सिलिंडरची किंमत किती? बुकिंग करण्याआधी दर जाणून घ्याच

Accident News : ४० हून अधिक प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर ३० जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT