Toll Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Toll rate Hike : मुंबईतील एन्ट्री आजपासून महागणार; 5 टोलनाक्यांवर जास्तीचे पैसे वसूल केले जाणार

Toll Rate Hike : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या टोल नाक्यावर टोल दरवाढ आजपासून (१ ऑक्टोबर) लागू होत आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

मुंबईत प्रवेश करण्यासाठी आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण आजपासून मुंबईच्या वेशीवर असलेल्या ५ टोलनाक्यांनावर आकारण्यात येणारा टोल वाढणार आहे. ५ रुपायंपासून ते ३० रुपयांपर्यंत ही टोलवाढ आहे.

टोलवाढीची घोषणा आधीच झाली आहे. आजपासून त्याची अमलबजावणी सुरु होत आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या टोल नाक्यावर टोल दरवाढ आजपासून (१ ऑक्टोबर) लागू होत आहे. पुढील तीन वर्षांसाठी ही वाढीव किंमत असणार आहे.

टोल व्यवस्थापनाचे कंत्राट देतानाच दर ३ वर्षानंतर टोलवाढ होणार असल्याचा करार आहे. त्यानुसार ही नियमीत दरवाढ होत असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र रस्त्यांवरील सुविधांचा अभाव आहे, अशात ही टोलवाढ का ? असा सवाल सुद्धा उपस्थित केला जात आहे. (Latest News)

कुठे होणार टोल वाढ?

ऐरोली, दहिसर पच्छिम द्रुतगती मार्ग, पूर्व द्रुतगती मार्ग मुलुंड, लाल बहाद्दूर शास्त्री मुलुंड ठाणे, वाशी सायन पनवेल महामार्गावरील टोल नाक्यांवर ही टोल वाढ होणार आहे. मागील २५ वर्षांपासून या टोल नाक्यांवर टोल वसुली सुरु आहे.

२००२ मध्ये कारसाठी २० रुपये, मिनीबस २५ रुपये, ट्रक बस ४५ रुपये तर अवजड वाहन ५५ रुपये टोल होता. यानंतर मागील काही वर्षात यामध्ये सातत्याने वाढ झाली आहे. आता पुन्हा वाढ होत असल्याने महागाईत आणखी एक फटका सर्वसामान्यांना बसणार आहे.

टोल नाक्यावरील दरवाढ

  • कार - ४५ रुपये (५ रुपये वाढ)

  • मिनी बस - ७५ (१० रुपये वाढ)

  • ट्रक/बस - १५० (२० रुपये वाढ)

  • अवजड वाहन - १९० (३० रुपये वाढ)

  • मासिक पास - १६०० (१०० रुपये वाढ)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

Shocking : रात्री गाढ झोपेत होत्याचं नव्हतं झालं, एकाच कुटुंबातील ४ महिला आगीत होरपळल्या

Gram Panchayat Elections: महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT