Blast Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात झालेल्या स्फोटात पाच जखमी! घरांच्या छतांचे नुकसान

पुण्यात विहीर खोदत असताना झालेल्या स्फोटात पाच जण जखमी झाले असून काही घरांच्या छताचे नुकसान झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुण्यात विहीर खोदत असताना झालेल्या स्फोटात पाच जण जखमी झाले असून काही घरांच्या छताचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी याबाबद्दल माहिती दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी संध्याकाळी शहरातील खराडी भागातील नदीजवळ स्फोट झाला.

'नदीजवळ एक विहीर खोदली जात होती आणि नियंत्रित स्फोटाच्या मदतीने उत्खनन केले जात होते. या कामादरम्यान, काही खडक फुटले आणि काही घरांच्या टिनच्या छतावर पडले, ज्यामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. स्फोटामुळे पाच जण किरकोळ जखमी झाले,' अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितली आहे.

पोलिसांनी स्फोट घडवून आणणाऱ्या अजय दासरीविरुद्ध IPC आणि स्फोटक पदार्थ कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Vastu Tips: महिन्याच्या शेवटी खिशात पैसा राहात नाही? आजच करा हे ५ सोपे उपाय; कधीही भासणार नाही पैशांची चणचण

SCROLL FOR NEXT