Khadki Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Pune news : एका मांजरीवरून 2 बायकांची जुंपली; वाद थेट पोलीस ठाण्यात

या प्रकरणी दोघींविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Dnyaneshwar Choutmal

Pune Women's Fight News : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याठिकाणी कधी कोयता गँगची दहशत, तर कधी कुत्रे, मांजरवरून भांडणाचे वाद काही नवीन नाही. असाच काहीसा एक प्रकार उघडकीस आला आहे.

पुण्यातल्या खडकी परिसरात राहणाऱ्या दोन महिलांची चक्क एका मांजरीवरून जुंपली आणि हे प्रकरण थेट खडकी पोलीस ठाण्यात पोहचलं आहे. या प्रकरणी दोघींविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उषा वाघमारे आणि रेश्मा शेख अशी या दोन महिलांची नवे आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

या प्रकरणात अधिक माहिती अशी की, उषा आणि रेश्मा हे पुण्यातल्या खडकी परिसरात एकच सोसायटी मध्ये शेजारी शेजारी राहायला आहेत. रेश्मा यांच्याकडे एक भटकी मांजर आहे. जिचा त्या घरात सांभाळत करतात.

काल दुपारच्या वेळेत उषा वाघमारे घरात कपडे धुत असताना रेश्मा यांची मांजर त्यांच्या घरात गेली. हे पाहून रेश्माने उषाच्या घरात जाऊन तिला परत आणल मात्र परत आणत असताना रेश्माने मंजिरला (Cat) शिव्या देत कोणाच्या घरात जायचं हे कळत नाही का ? असं बोलल्या हे पाहून उषा या चांगल्याच संतापल्या आणि दोघांमध्ये तू तू मैं मैं ला सुरवात झाली.

नंतर या दोघी महिला एकमेकांना शिव्या देऊ लागल्या आणि हा वाद टोकाला जात उषा आणि रेश्मा मध्ये हाणामारी झाली. त्यानंतर हा वाद थेट खडकी पोलीस (police) ठाण्यात पोहचला. पोलिसांनी दोघांची बाजू ऐकून घेतली. दोघांनी एकमेकांविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: विजेचा धक्का लागून २ भावांचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर मुलांनी सोडले प्राण

Lizard : पालींनी हैराण केलंय? पाली घरातून कायमच्या पळवण्यासाठी करा हे घरगुती उपाय!

Thane Tourism : मुंबईजवळचं ठाणे पावसाळ्यात होते स्वर्गाहून सुंदर, वीकेंडला नक्की फिरा 'ही' ठिकाणे

Maharashtra News Live Update: पालघरमध्ये जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारण्याच्या हालचाली सुरू

Delhi : CNG पंपावर मोठा स्फोट, तिघांचा मृत्यू; गॅस भरताना टाकी फुटल्यानं परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT