कल्याण : कल्याण (Kalyan) पूर्वेतील पुना लिंक रोडवरील बँक ऑफ बडोदा समोरील सुमारे ७० फुट उंचीचे एक ताडाचे झाड आहे. या झाडावर सकाळ पासून पतंगीच्या मांजात घार (Black Kite) अडकली होती. याची माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशामक (Fire Brigade) दलाला दिली. अग्निशामक दलाचे जवान त्वरित घटनास्थळी आले आणि त्यांनी ३ तासात घारीची सुखरूप सुटका केली.
हे देखील पहा :
गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास कल्याण (Kalyan) पूर्वेतील पुना लिंक रोडवरील बँक ऑफ बडोदा समोरील सुमारे ७० फुट उंचीच्या ताडाच्या झाडावर पतंगीच्या मांजात घार अडकून लटकत होती. ही माहिती स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दलाला दिली. केडीएमसीच्या (KDMC) प्रभाग ड कार्यालयातील अग्निशमन दल प्रमुख संजय आंबोकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी १० वाजल्यापासून अडकलेल्या घारीचे रेस्क्यू (Rescue) ऑपरेशन सुरु केले. दरम्यान ७० फुटापर्यंत शिडी पोहचत नव्हती, तसेच झाडाच्या बाजूलाच अतिउच्च दाबाच्या विजवाहीन्या असल्यामुळे या पक्षाची सुटका करण्यात प्रचंड प्रमाणात अडचणी निमार्ण होत होत्या.
परंतु, अग्निशमन दलाच्या जवानांनी बाजूच्या इमारती (Building) वरुन बांबू आणि दोराच्या सहाय्याने या पक्षाला आपल्या बाजुला खेचून घेऊन अखेर त्यांची सुखरूप सुटका केली. घारीला किरकोळ जखम झाली असून तिला प्राणी मित्रांकडे सुपूर्द करण्यात आले. दरम्यान सुमारे तीन तास चाललेल्या या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये मांजात अडकलेल्या घारीची सुखरूप सुटका केल्याने अग्निशमन दलाचे परिसरातील नागरीकांकडून कौतुक होत आहे.
Edited By : Krushnarav Sathe
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.