Devotees gather near the steps of Jejuri Temple moments after a fire broke out during the Bhandara celebration. Saam Tv
मुंबई/पुणे

खंडेरायाच्या चरणी भंडारा उधळताना आग; भंडाऱ्यातील भेसळ पुन्हा ऐरणीवर

Fire During Bhandara Celebration At Jejuri: जेजुरीत भंडाऱ्यांची उधळण सुरु असताना आगीचा भडका उडालाय. गंभीर बाब म्हणजे या घटनेमुळे भंडा-यातील भेसळीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. ही दुर्घटना कशी घडली?

Omkar Sonawane

येळकोट येळकोट जयमल्हार अशा जयघोषात जेजुरीत खंडेरायाच्या चरणी भंडाऱ्याची उधळण केली जात असतानाच अचानक आगीचा भडका उडाला.... आणि एकच गोधळ झाला.. जेजुरी नगरपरिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं बाजी मारली... त्यामुळे कार्यकर्त्यांनी थेट जेजुरी गाठत पायरीजवळ भंडाऱ्यांची उधळण सुरु केली... मात्र त्याचं वेळी आगीचा भडका उडाला आणि त्यात दोन नवनिर्वाचित नगरसेवकांसह तब्बल 16 जण भाजलेत....

हा भडका उडण्यासाठी भंडाऱ्यातील भेसळ कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जातय. आठ महिन्यापूर्वी मार्तंड देव संस्थांचे माजी विश्वस्त शिवराज झगडे यांनी भंडाऱ्यात होत असलेल्या भेसळीमुळे भावीकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचा आरोप केला होता...त्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना निवेदनही दिलं होतं... मात्र त्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही....

जेजुरीचा खंडेराया महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मोठ्या भक्ती भावना महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने भाविक जेजुरी येत असतात. कित्येक गोण्या भरून भंडारा इथे येत असतो. मात्र हा भंडारा नक्की कोठून येतो हे निश्चित नाही. व्यापारी ही यावर बोलायला तयार नाहीत. ही दुर्घटना जर भेसळयुक्त भंडाऱ्यामुळेच झाली असेल तर त्यावर तातडीनं कारवाई व्हायला हवी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dog Mediclame: आता कुत्र्याचाही मेडिक्लेम?, कुत्रा चावला तरी मिळणार भरपाई

Sri Lanka vs Australia T20 WC: श्रीलंकेच्या धुरंधरांनी कांगारूंना रडवलं; वर्ल्ड कपमधून ऑस्ट्रेलियानं गाशा गुंडाळला

Panipuri: तुमच्या पाणीपुरीत चक्क जिवंत उंदीर, फूड ब्लॉगरच्या VIDEO ने खळबळ

अल्पसंख्याक शाळांचा घोटाळा; राज्यातील 95 टक्के अल्पसंख्याक शाळा बोगस',घोटाळ्याचा 'गॉडफादर' कोण?

Holi Special Train: शिमग्यानिमित्त गावी जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज, होळी विशेष गाड्या धावणार; ट्रेनची लिस्ट वाचून आताच करा बुकिंग

SCROLL FOR NEXT