Breaking Mumbai Fire Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Fire: ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीला आग, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट

Mumbai Fire: ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे.

Shivani Tichkule

रुपाली बडवे

Trident Building Fire: मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मरीन ड्राईव्हवर परिसरातील ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीला आग लागल्याची माहिती समोर येत आहे. इमारतीच्या वरच्या मजल्यावरून धुराचे लोळ पाहायला मिळाले. मात्र, ही आग नेमकी कशी लागली याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे.ट्रायडंट हॉटेलच्या इमारतीच्या टेरेसवरून धुराचे लोळ बाहेर पडताना दिसून येत आहे.  (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी पहाटे 6:50 ते 7:10 च्या घडली. मरीन लाईन्स परिसरातील हॉटेल ट्रायडेंटच्या वरच्या मजल्यावरून अचानक काळा धूर यायला सुरुवात झाली. रविवार असल्याने मरीन ड्राईव्हवर मोठ्या संख्येने नागरिक मॉर्निंगसाठी जमले होते. (Mumbai News)

मॉर्निंगसाठी आलेल्या काही लोकांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात हे दृश्य टिपायला सुरुवात केली. मात्र काही वेळात हा धूर येणं थांबल्याने नक्की ट्रायडेंटमध्ये काय झालं होतं हे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

हॉटेलमधून धूर निघत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलच्या इमारतीला आग लागली नसल्याचे मुंबई अग्निशमन दलाचे म्हणणे आहे. "ही आगीची घटना नव्हती तर एक चिमणीतून थोडा धूर निघत होता आणि आग लागल्यासारखं वाटत होतं. आम्ही आमच्या टीमलाही घटनास्थळी हलवलं पण तिथे काहीच नव्हतं, आम्ही अजूनही घटनास्थळीच आहोत, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वीजेच्या खांबाला करंट लागून एका 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Diabetes : पांढरा की ब्राऊन, मधुमेहींनी कोणता तांदूळ खावा?

Skin Care Tips : बटाटा की काकडी, डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काय उत्तम? काय जास्त फायदेशीर?

Gold Rate Today : सणासुदीच्या तोंडावर सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ! सोनं इतक्या रुपयांनी वाढलं; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Weight Loss: वजन कमी करायचंय पण भातही खायचाय? दुपार की रात्री...; भात कधी खाल्ल्यास मिळतो जास्त फायदा

SCROLL FOR NEXT