fire Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking News: तारापूर औद्योगिक वसाहतीतील केमिकल कंपनीस आग; एकाचा मृत्यू

बोईसर एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

रुपेश पाटील

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीतील (tarapur midc) कॅम्लीन नाका परिसरातील केंबोंड केमिकल प्लॉट नंबर ई ६/३ तसेच ई ४ या कंपनीत स्फाेट झाल्याने भीषण आगीत एकाचा मृत्यू झाला आहे. ही आग (fire) आटाेक्यात आणण्यात अग्निशमन दलास (fire brigade) यश आले आहे. (palghar latest marathi news)

ही भीषण आग सकाळच्या सुमारास लागली. त्यानंतर एमआयडीसीचे अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पाेहचल्या. ही आग आटोक्यात आणण्याचे काम अग्निशमन दलाने उत्तमरित्या केले.

आगीमुळे धूराचे लाेट परिसरात पसरले. या कंपनीच्या बाहेर नागरिकांची गर्दी झाली हाेती. अग्नीशमन विभागाने कंपनीतील कामगारांना कंपनी बाहेर सुरक्षितस्थळी हलविले. मात्र या दुर्घटनेत कंपनीतील प्रोडक्शन विभागातील व्यवस्थापकाचा मृत्यू झाला. दुलेश पाटील असे मृत्यू झालेल्या प्राेडक्शन विभागाच्या व्यवस्थापकाचे नाव आहे. बोईसर एमआयडीसी पोलीस घटनास्थळी असून आगीचे कारण अजूनही अस्पष्ट असल्याचे पाेलीसांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : काकीसोबत पुतण्याचं सिक्रेट अफेअर! काकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् भयंकर घडलं

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या राठी जीन परिसरात भीषण आग

केजरीवालांच्या आपमध्ये फूट, राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

Mithila Palkar: परी म्हणू की सुंदरा...; मिथिला पालकरचा हटके स्वॅग

Panvel Tourism: अवघ्या १०० रूपयांत फिरा पनवेलमधील ही ठिकाणे, विकेंडला येईल फुल टू मज्जा

SCROLL FOR NEXT