School Bus Saam Tv
मुंबई/पुणे

Breaking News: New Horizon स्कूल बसला लागली आग; विद्यार्थी सुखरुप

सर्व विद्यार्थी सुखरुप असल्याची माहिती पाेलीसांनी दिली.

विलास काटे

ठाणे : ठाण्यातील (thane) तीन हात नाका येथून ऐरोलीस (airoli) चाललेल्या न्यू होरायझन स्कुलच्या बसला (new horizon school bus) अचानक आग लागली. यावेळी स्कूल बस चालक आणि वाहतूक पोलिसांनी (police) तत्परतेने बसमधील (school bus) सर्व मुलांना सुखरुप बाहेर काढले. (thane latest marathi news)

या बसच्या बॅटरीला किरकोळ आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. बस चालक आणि पाेलीसांनी तात्काळ सर्व मुलांना बसच्या बाहेर काढले. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार बसमधून प्रवास करणारी सर्व मुले इयत्ता पहिली ते तिसरी पर्यंतची हाेती. सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

दरम्यान या घटनेमुळे वाहतुकीची काेंडी हाेऊ नये यासाठी बस रस्त्याच्या मधून बाजूला काढून ती एका रस्त्याच्या कडेला लावण्यात आली. अग्नीशमन विभागाने बसवर पाण्याची फवारे मारत आग विझवली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon 2026 Update: जूनमध्येही उष्णतेचा तडाखा कायम; महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस

Maharashtra News Live Update: अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

९० किमी वेग, धडकी भरवणारं वादळ धडकणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, कुठे कोसळणार धो-धो पाऊस?

T20 वर्ल्ड कप खेळणारा संघ निलंबित; IPL होताच ICCची मोठी कारवाई

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT