भिवंडीत फर्निचर गोदामांसह कारखान्याला भीषण आग... फय्याज शेख
मुंबई/पुणे

भिवंडीत फर्निचर गोदामांसह कारखान्याला भीषण आग...

भिवंडीत आगीचे सत्र काही दिवस थांबले असे वाटत असतानाच आज पुन्हा फर्निचर गोदामांसह कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फय्याज शेख, भिवंडी

भिवंडी: भिवंडीत आगीचे सत्र काही दिवस थांबले असे वाटत असतानाच आज पुन्हा फर्निचर गोदामांसह कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच भिवंडी, ठाणे, कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या ४ ते ५ गाड्या जवानांसह घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. (Fire breaks out in Bhiwandi furniture warehouse)

हे देखील पहा -

भिवंडी - ठाणे मार्गावर भिवंडी तालुक्यातील कशेळी टोल नाक्या नजीक महालक्ष्मी फर्निचर नावाचे मोठे शोरूम आणि कारखाना आहे. आज रात्रीच्या सुमारास अचानक या ठिकाणी आग लागली. ही आग लाकडी फर्निचर असल्याने काही क्षणातच गोदाम, कारखाना लगतच्या दुकानांमध्ये पसरली. या आगीत आतापर्यंत लाखो रुपयांचे फर्निचर जळून खाक झाले आहे.

दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही समजू शकले नाही. आतापर्यंत या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याचेही सांगण्यात आले. घटनास्थळी स्थानिक नारपोली पोलिसांचे पथक दाखल असून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही लगतचे दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने आगीची तीव्रता अधिकच वाढली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shirvale Recipe : मॅगीसारखा दिसणारा कोकणातला हा पदार्थ कोणता? वाचा परफेक्ट शिरवाळ्याच्या पीठाची रेसिपी

Bhagavad Gita: भगवद्गीतेचा आठवा अध्याय कोणती शिकवण देतो?

Personality Traits: 'R' अक्षर असलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?

Sara Ali Khan Skin Care: सारा अली खानची ही स्किन केअर रूटीन करा फॉलो, तुमचीही त्वचा करेल ग्लो

खुशखबर! पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना १५ हजार रूपये मिळणार; मोदी सरकारकडून योजनेत मोठा बदल

SCROLL FOR NEXT