Nitesh And Narayan Rane Saam Tv
मुंबई/पुणे

राणे पिता-पुत्रांना दिशा सालियान प्रकरण भोवणार? मालवणी पोलिसात FIR दाखल

पोलिसांनी महिला आयोगाला दिला आहवाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये चांगलेच राजकीय संघर्ष सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये नारायण राणे (Narayan Rane) यांनी सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन (Disha Salian) यांची हत्या झाल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी आता केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या विरोधात मालवणी पोलीस (Police) स्थानकात FIR दाखल करण्यात आली आहे.

हे देखील पहा -

दिशा सालीयनवर लैंगिक अत्याचार झाल्याचं राणे पिता पुत्रांनी आरोप केला होता. या प्रकरणी दिशा सालीयानच्या आई आणि वडिलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

पोलिसांनी महिला आयोगाला एक आहवाल दिला आहे. या अहवालात दिशा सालीयानवर पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ती गरोदर नसल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibaug Tourism : न्यू इयरला अलिबागला गेलाय? मग 'हे' ऐतिहासिक ठिकाण पाहायला विसरू नका

Namo Bharat Express: नमो भारत ट्रेनमध्ये ठेवले शरीरसंबंध, व्हिडीओत दिसलेल्या 'त्या' तरुण-तरुणीचं होणार लग्न

Matar Dhokla Recipe : स्नॅकसाठी बनवा स्पंजी मटार ढोकळा, वाचा सोपी रेसिपी

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याच्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन

RailOne App: रेल्वेचा मोठा निर्णय! यापुढे UTS अ‍ॅपवरुन मासिक पास काढता येणार नाही; पर्याय काय?

SCROLL FOR NEXT