Shivsena SaamTV
मुंबई/पुणे

Crime News: विनयभंग प्रकरणी शिवसेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

तक्रारदार महिला घरकाम करत असून, पतीपासून विभक्त असलेल्या या महिलेचे व तिच्या एका मित्राचे खाजगी फोटो जिल्हा सल्लागार बबन पाटील व माजी शहर प्रमुख शंकर ठाकूर यांनी समाज माध्यमांवर व्हायरल केले होते.

विकास मिरगणे

नवी मुंबई - शिवसेना रायगड जिल्हा सल्लगार बबन पाटील आणि खारघर शिवसेनेचे (Shivsena) माजी शहरप्रमुख शंकर ठाकूर यांच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडघर मध्ये राहणाऱ्या महिलेने केलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिला घरकाम करत असून, पतीपासून विभक्त असलेल्या या महिलेचे व तिच्या एका मित्राचे खाजगी फोटो जिल्हा सल्लागार बबन पाटील व माजी शहर प्रमुख शंकर ठाकूर यांनी समाज माध्यमांवर व्हायरल केले होते.

हे देखील पहा -

या बाबतचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या या महिलेसोबत माजी शहर प्रमुख शंकर ठाकूर यांनी गलिच्छ भाषेत बोलत धक्का बुक्की केल्याची तक्रार नोंदवण्यात आली असून जिल्हा सल्लागार बबन पाटील यांनी या महिलेचे व तिच्या मित्राचे फोटो बॅनरवर लावून बदनाम करण्याची धमकी देखील दिली असल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती खारघर पोलिसांनी दिलेय. या प्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केली नसून पोलिस काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT