Pune News: पुण्यात ओबीसी आरक्षण मोर्चात हाणामारी, काँग्रेसने आयोजित केलेला हल्लाबोल मोर्चा...(पहा Video) Saam Tv
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात ओबीसी आरक्षण मोर्चात हाणामारी, काँग्रेसने आयोजित केलेला हल्लाबोल मोर्चा...(पहा Video)

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेस आणि ओबीसी कार्यकर्ते एकमेकांत भिडल्याचा प्रकार समोर आला

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेस आणि ओबीसी कार्यकर्ते (OBC Reservation ) एकमेकांत भिडल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हाधिकार्यालयात मंगळवारी ओबीसी आरक्षणाच्या मागणीकरिता काँग्रेसतर्फे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर काँग्रेस आणि ओबीसी समाजातील कार्यकर्ते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले होते. (Fighting in OBC reservation front in Pune Congress)

पहा व्हिडिओ-

एवढेच नव्हे तर, आंदोलनाच्या दरम्यान, ओबीसी कार्यकर्त्या मृणाल ढोले पाटील यांनी काँग्रेसचे मंत्री विजय वड्डेटीवार यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. यामुळे काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. ओबीसी आरक्षणाकरिता काँग्रेसतर्फे जिल्हाधिकार्यालयात (Collector Office Pune) आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. आंदोलन सुरू असताना ओबीसी कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील यांनी काँग्रेस मंत्री विजय वड्डेटीवार यांच्याविरोधामध्ये घोषणाबाजी करत काळा झेंडा दाखवत निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आणि ढोले पाटील यांच्यात धक्काबुकी झाली. ढोले पाटील या ओबीसींना आरक्षण मिळावे म्हणून लढा देत आहेत. मात्र, ओबीसींच्या आरक्षणकरिता काँग्रेसनेच आयोजित केलेल्या आंदोलनात विजय वड्डेटीवार यांच्या नावाने घोषणाबाजी आणि काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Edited by- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गाचे काम आद्यपही अपूर्णच

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT