युनियनच्या स्थापनेवरून तारापूर MIDCमधील विराज प्रोफाइल कंपनीत राडा! SaamTVnews
मुंबई/पुणे

युनियनच्या स्थापनेवरून तारापूर MIDCमधील विराज प्रोफाइल कंपनीत राडा!

कंपनीत कामगारांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीतील पोलाद उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या विराज प्रोफाइल कंपनीमध्ये कामगारांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील काही कायम कामगारांनी कंत्राटी कामगारांना आणि पोलिसांना मारहाण केली आहे. आठ ते दहा हजार कामगार असणाऱ्या कंपनीत हा वाद झाल्याने परिसरात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळाकडे रवाना झाला आहे.

हे देखील पाहा :

मिळालेल्या माहितीनुसार, विराज प्रोफाइल कंपनीतील एका कामगार संघटनेनं १६ मेपासून काम बंद ठेवण्याची नोटीस बजावली होती. पण, संपाच्या कालावधीत कंपनी कंत्राटी कामगारांनामार्फत काम सुरू ठेवू शकते, अशी शंका कायम कामगारांना होती. त्यामुळे संपाच्या काही दिवस आधीपासूनच कायम कामगारांनी उत्पादन बंद केलं होतं. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर, पालघर प्रथमवर्ग न्यायालयाने उत्पादन बंद ठेवणाऱ्या कामगारांनी कंपनीच्या आवारापासून ५० मीटर अंतर दूर राहावं, असा आदेश दिला होता. या पार्श्वभूमीवर कामगार उपायुक्त तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्यात संयुक्त बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

दरम्यान, १०० ते १५० कायम कामगारांच्या गटाने विराज कंपनीच्या आतमध्ये प्रवेश केला. यावेळी कामगारांनी कंपनीच्या मालमत्तेचं नुकसान केल्याचं वृत्त हाती आलं आहे.यावेळी झालेल्या तुंबळ हाणामारीत काही कंत्राटी कामगारासह विराज कंपनीचे अधिकारी आणि पोलीस जखमी झाल्याचं सांगण्यात येतं आहे. आठ ते दहा हजार कामगार संख्या असणाऱ्या या कंपनीतील कामगारांमधील वाद विकोपाला गेला आहे. कंपनीतील उपकरणांचं आणि व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांच्या दालनांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT