Shreemant Dagdusheth Halwai Ganpati) saam tv
मुंबई/पुणे

पुणे : 'दगडूशेठ हलवाई' गणपतीला ५० लाख फुलांचा सुवासिक पुष्पनैवेद्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati) दर्शन घेण्यासाठी गणेशभक्तांनी अंगारकी चतुर्थीनिमित्त अलोट गर्दी केली होती. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात वासंतिक उटी मोगरा महोत्सवानिमित्त ५० लाख सुवासिक फुलांचा पुष्पनैवेद्य (Fifty lakh flowers) गणरायाला दाखविण्यात आला. मोगऱ्यासह गुलाब, चाफा, झेंडू, लिलीसारख्या फुलांनी सजलेला सभामंडप आणि गाभारा तसेच मुकुट, शुंडाभूषण, कान व पुष्पपोशाखाने सजलेले गणरायाचे मनोहारी रुप पुणेकरांना पाहायला मिळाले. अंगारकी चतुर्थीनिमित्त (Angarki Sankashti Chaturthi Celebration) कळसापासून पायथ्यापर्यंत केलेली पुष्पआरास आणि मोगरा महोत्सवानिमित्त विविधरंगी फुलांनी सजलेले मंदिर पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, अक्षय गोडसे यांसह विश्वस्त व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले होते. तब्बल १०० महिला व १२५ पुरुष कारागीरांनी पुष्पसजावटीची तयारी केली होती.

यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये ७०० किलो मोगरा, २५ हजार चाफा, ५० हजार गुलाब, ५० किलो कन्हेर, जाई, जुई, केवळा, कमळ, ५०० किलो गुलछडी, पासली, लिली यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती. गणरायाच्या मूर्तीला केलेली रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता. मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले.

Edited By- Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT