Pune Crime: धक्कादायक! महिला शिक्षिकेवर पोलिसाकडून बलात्कार Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Crime: धक्कादायक! महिला शिक्षिकेवर पोलिसाकडून बलात्कार

धक्कादायक घटना ताजी असतानाच आता पिंपरीत आणखी एक बलात्काराची घटना समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: अलीकडे पिंपरीत (Pimpri) एका महिला वकिलावर पुरुष वकिलाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली होती. नराधम आरोपीने पीडित महिलेला गुंगीचे औषध पाजून विकृतीचा कळस गाठला होता. ही धक्कादायक घटना ताजी असतानाच आता पिंपरीत (Pimpri) आणखी एक बलात्काराची घटना समोर आली आहे. येथील एका पोलिसाने (police) महिला प्राध्यापकावर बलात्कार केला आहे. आरोपीने पीडित महिलेचा एकटेपणाचा गैरफायदा घेत आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार (sexual assualt ) कला आहे. (Female teacher sexual assualt by police Pune Crime)

हे देखील पहा-

कायद्याचे रक्षण करणाऱ्यांनीच लैंगिक शोषण केल्यामुळे पोलीस (police) प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे. आकाश प्रकार पांढरे असे गुन्हा दाखल झालेल्या 30 वर्षीय आरोपी पोलिसाचं नाव आहे. तो पुण्यात हिंजवडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. आरोपी पांढरे गेल्या काही काळापासून पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण करत होता. दरम्यान पीडित महिला गरोदर राहिली असता, आरोपीने पीडितेला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात घडवून आणला आहे. या प्रकरणी २८ वर्षीय पीडित प्राध्यापक महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय पीडित महिला आपल्या मुलीबरोबर भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. ती एकटी राहत असल्याचे पाहून आरोपी पांढरे यानं तिचा गैरफायदा घेतला आहे. आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेला भोसरी, साखरेवस्ती आणि हिंजवडी फेज या परिसरात घेऊन जात वारंवार जबरदस्तीने शारीरिक आणि अनैसर्गिक संबंध ठेवले आहेत.

हा धक्कादायक प्रकार ऑक्टोबर २०२० ते २ जानेवारी २०२२ या काळात घडला आहे. या दरम्यान पीडित प्राध्यापिका गरोदर राहिली असता, आरोपीने गर्भपाताच्या गोळ्या खायला देऊन पीडितेचा गर्भपात घडवला आहे. तसेच तू एकटी कशी राहते, तेच बघतो, अशी धमकी देत आरोपी पोलिसांने दिल्याचे फिर्यादीमध्ये सांगितले आहे. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Curly Hair Care Tips : रोज स्ट्रेटनर वापरून कंटाळलात? करा हे सोपे उपाय; कुरळे केस होतील स्ट्रेट

Spain Migrants: स्पेनमध्ये समुद्रमार्गे हजारो नागरिकांची घुसघोरी, परिस्थिती चिघळली; १८ जणांचा मृत्यू, थरारक VIDEO

Maharashtra News Live Update:गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी काँग्रेसला पोलिसांनी दिली परवानगी

Gold Price Today : सलग दुसऱ्या सोन्याने घतली उसळी, प्रति तोळा इतक्या रुपयांवर दर पोहोचला; वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे दर

Weight Loss Tips: वजन झटपट कमी करायचंय? फक्त 'या' 3 सवयी लावा; महिनाभरात कपडे होतील सैल

SCROLL FOR NEXT