Pune Crime google
मुंबई/पुणे

Pune Crime: पुण्यात महिला पोलिसाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की, दुचाकीस्वार महिलेवर गुन्हा दाखल

Warje Crime In Pune: दुचाकीस्वार महिलेने वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलिसाला शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याची घटना वारजे भागात घडली. याप्रकरणी वारजे पोलिसांनी दुचाकीस्वार महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Dhanshri Shintre

वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलिसाला दुचाकीस्वार महिलेने धक्काबुक्की केल्याची घटना वारजे परिसरात घडली. याबाबत वारजे पोलीस ठाण्यात दुचाकीस्वार महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस कर्मचारी यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून एका २६ वर्षीय दुचाकीस्वार महिलेविरुद्ध सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला पोलीस कर्मचारी शुक्रवारी सायंकाळी वारजे परिसरातील चौकात वाहतूक नियमन करीत होत्या. त्यावेळी त्यांनी वाहतूक नियमाचे उल्लंघन करून विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीस्वार महिलेस जाब विचारला. त्यावर दुचाकीस्वार महिलेने कर्मचारी आणि त्यांच्या सहकारी महिला पोलीस यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्यानंतर दुचाकीस्वार महिला पसार झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी वारजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात वाहतूक नियमन करत असताना पोलीस शिपाई ऋतुजा तांबे यांनी एका दुचाकीस्वार महिलेचा वाहतूक नियम भंग केल्यामुळे तिला अडवले. महिला विरुद्ध दिशेने चालली होती, त्यामुळे पोलीस शिपाई तांबे यांनी तिला थांबवून कारवाई केली.

दुचाकीस्वार महिलेने वाहतूक नियमन करणाऱ्या पोलीस शिपाई तांबे यांना कारवाई करताना शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. तांबे यांनी सहकारी महिला पोलीस शिपाई चव्हाण यांना माहिती दिली, तेव्हा दुचाकीस्वार महिलेने दोन्ही पोलीस महिलांना पुन्हा शिवीगाळ आणि धक्काबुक्की केली. झटापटीत महिला पळून गेली. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: १४.३% वाढ की १४०% पगारवाढ? ₹६९ हजार पगाराचा आकडा चर्चेत कसा आला? जाणून घ्या...

Maharashtra News Live Update: CJP नेते सौरव दास आणि आशुतोष रांका प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाचा सवाल; तातडीच्या सुनावणीवर प्रश्नचिन्ह

Mangalsutra Designs: महिलांसाठी मॉडर्न मंगळसूत्राचे लेटेस्ट पॅटर्न, ५ डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये

Gold Price Today: जळगावच्या सुवर्ण बाजारासाठी दसरा ठरला निरस; सोन्याचे भाव घसरूनही उलाढालीत १५ टक्क्यांची घट; आजचे दर किती?

MHT-CET Exam 2027 : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! MHT CET ची परीक्षा कधी होणार? सीईटी सेलची महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT