मुलीची छेड काढल्याचा राग अनावर झाल्याने बापाने केली वयोवृद्ध आचार्याची हत्या Saam TV
मुंबई/पुणे

मुलीची छेड काढल्याचा राग अनावर झाल्याने बापाने केली वयोवृद्ध आचार्याची हत्या

मुलीची छेड काढल्याचा राग अनावर झाल्याने बापाने वयोवृद्ध आचार्याची हत्या केली आहे.

सुरज सावंत

सुरज सावंत

मुंबई : मुलीची छेड काढल्याचा राग अनावर झाल्याने बापाने वयोवृद्ध आचार्याची हत्या केली आहे. मानखुर्द पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी पती-पत्नीला अटक केली आहे.

अब्दुल खलील शेख ( वय ६९) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते व त्याची पत्नी आरोपी सलीम जाफर मो. अख्तर आलम उर्फ सलीम यांच्याकडे आचारी म्हणून काम करत होते. दरम्यान मृत अब्दुल शेख याने आरोपींची १२ वर्षीय मुलगी मुलुंड साठेनगर येथे झोपली असताना तिला उठवताना मुलीला चुकीचा स्पर्श केला.

ही बाब मुलीने तिचे वडिल आरोपी सलीम जाफर याला सांगितली. त्यावेळी राग अनावर झालेल्या सलीमने अब्दुल याला पट्याने व काठीने गंभीर मारहाण केली. या मारहाणीत अब्दुल शेख याचा मृत्यू झाल्यानं आरोपी सलीम व त्याच्या पत्नीने अब्दुल याचा मृतदेह पुरावा नष्ठ करण्याच्या हेतूने मानखुर्द लिंक रोड येथील साठे नगर येथे टाकून पळ काढला.

हे देखील पहा-

मृतदेह मिळाल्यानंतर मानखुर्द पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपासाला सुरूवात केली. यावेळी आरोपी व त्याची पत्नी या दोघांचा सहभाग निश्चित झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केल्याची माहिती मानखुर्द पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika Mandanna : रश्मिका मंदान्ना शूटिंगदरम्यान गंभीर जखमी, नेमकं झालं काय?

PM Modi: 'मला माझ्या आईला शिव्या दिल्या, पण मी...' पंतप्रधान मोदींनी GEN-Z ना केलं मोठं आवाहन

Maharashtra News Live: शिर्डी पोलिसांनी पुन्हा घेतला भोंदू अशोक खरात याचा ताबा

Kothimbir Vadi Recipe: घरच्या घरी बनवा खमंग कोथिंबीर वडी; चहासोबत लागेल भन्नाट चव

Rain Alert : आजही पावसाचा हाहाकार, विदर्भासह राज्यातील १३ जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT