वडिलांनीच केली आपल्या ७ वर्षीय बालिकेची निर्घृण हत्या; कारण ऐकाल तर व्हाल थक्क Saam TV
मुंबई/पुणे

वडिलांनीच केली आपल्या ७ वर्षीय बालिकेची निर्घृण हत्या; कारण ऐकाल तर व्हाल थक्क

मुंब्रा येथील संतोषनगर भागामध्ये अनिस मालदार खान (वय-३३) याने त्याची ७ वर्षीय मुलगी माहिरा हिचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ठाणे : मुंब्रा येथील संतोषनगर भागामध्ये अनिस मालदार खान (वय-३३) याने त्याची ७ वर्षीय मुलगी माहिरा हिचा गळा दाबून खून केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. मुलीच्या हत्येनंतर अनिस याने देखील विष प्राशन केले आहे. कळवा या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी अनिस विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संतोष नगर परिसरात अनिस हा पत्नी आणि मुलगी माहिरासह राहत होता. शुक्रवारी रात्री अनिस आणि त्याच्या पत्नीमध्ये वाद झाला होता. त्यानंतर त्याची पत्नी मुलीला घेऊन शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांकडे निघून गेली होती. अनिसही त्यांच्या पाठीमागे निघून गेला होता. तिथेही त्यांच्यात मोठा वाद झाला. त्यानंतर अनिसने माहिराला पळवून दत्तुवाडी येथील निर्जनस्थळी नेले होते.

हे देखील पहा-

पत्नीला मोबाईवर फोन करून माहिराचा शेवटचा आवाज ऐकून घे असे सांगत त्याने फोन बंद केला होता. त्यानंतर अनिसची पत्नी वारंवार त्याला संपर्क साधत होती. शनिवारी पहाटे अनिसने फोन सुरू केला आणि माहिराची हत्या केल्याचे पत्नीला सांगितला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने अनिसला घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे.

यावेळी त्याने विष प्राशन केले होते. पोलिसांनी तात्काळ त्याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहिराच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार मुंब्रा पोलिसांनी अनिस विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT