Ghatkoper Saam Tv News
मुंबई/पुणे

Ghatkoper Crime: नकोशी! पाळण्याच्या दोरीनेच ४ महिन्याच्या लेकीचा बापाने जीव घेतला, घाटकोपर हादरलं

Father kills daughter Ghatkoper Crime News: मुलगी नको म्हणून एका नराधम बापानं आपल्या चार महिन्याच्या मुलीची गळा दाबून हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना घाटकोपर पूर्वमध्ये घडली आहे.

Bhagyashree Kamble

मयुर राणे, साम टीव्ही

मुलगी नको म्हणून एका नराधम बापानं आपल्या चार महिन्याच्या मुलीची गळा दाबून हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना घाटकोपर पूर्वमध्ये घडली आहे. आरोपी आपल्या पत्नी आणि मुलांसोबत राहतो. त्याला तिसरे अपत्य मुलगी झाली म्हणून तो चिडला. या कारणामुळे तो पत्नीसोबत वारंवार भांडण करत होता. राग अनावर झाल्यामुळे त्यानं थेट पाळण्याच्या दोरीने गळा आवळून हत्या केली आहे. आरोपी बापाला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घाटकोपर पूर्वेतील कामराज नगरमध्ये घडली आहे. मुलगी नको म्हणून एका नराधम बापानं मुलीची गळा आवळून हत्या केली आहे. चिमुकली ४ महिन्यांची असल्याची माहिती समोर आली आहे. संजय बाबू कोकरे असे आरोपी बापाचे नाव आहे.

संजय बाबू कोकरे आपल्या पत्नी आणि २ मुलांसोबत राहतो. त्याला तिसरी मुलगी झाल्यानं तो चिडला होता. या कारणावरून दोघांमध्ये भांडणं होत असे. या गोष्टीचा राग त्याच्या मनात होता. पत्नी काही कामानिमित्त घराबाहेर गेली होती. यावेळी नराधम बापानं त्या चार महिन्याच्या मुलीची हत्या केली. त्यानं पाळण्याच्या दोरीनं चिमुकलीचा गळा आवळला.

गळा आवळल्यामुळे चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती पंतनगर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंतनगर पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Crime: धावत्या मेमू लोकलमधून महिलेला ढकललं; सीसीटीव्ही फुटेजमुळे उलगडला हत्येचा थरार

काळजाचा थरकाप! प्रशासनाची बंदी झुगारून धबधब्यावर 17 जणांची हुल्लडबाजी; पुण्याचे दोन पर्यटक बुडाले

Thane Tourism : ठाण्याच्या जंगलात लपलाय सुंदर धबधबा, सौंदर्य पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Crime News : मुलीजवळ आला पॅन्टची चैन उघडली अन्...; बसमध्ये तरुणाचं किळसवाणं कृत्य

Maharashtra News Live Update: माणगावच्या देवकुंड धबधब्यात दोन पर्यटक बुडाले

SCROLL FOR NEXT