Amruta Fadnavis Threat  Saam TV
मुंबई/पुणे

Amruta Fadnavis News : अमृता फडणवीस यांना १ कोटींची लाच देण्याचा प्रयत्न; महिलेसह एकावर गुन्हा, नेमकं काय घडलं?

Amruta Fadnavis Threat : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एका महिलेने धमकावून १ कोटी रुपयांची लाच ऑफर करण्याचा प्रयत्न केला.

साम टिव्ही ब्युरो

Amruta Fadnavis Threat News : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना एका महिलेने धमकावून १ कोटी रुपयांची लाच ऑफर करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अमृता यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका डिझायनर महिलेसह तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Latest Marathi News)

अनिष्का असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित महिलेचं नाव आहे. अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी महिला डिझायनर असल्याने अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आली होती. संबंधित आरोपी महिला अमृता यांच्या जवळपास 16 महिने संपर्कात होती.  (Maharashtra Breaking News)

एका गुन्ह्यात आम्हाला मदत करा अशी त्याबदल्यात तुम्हाला १ कोटी रुपये देऊ, अशी ऑफर (Crime News) महिलेसह तिच्या वडिलांनी दिली होती. अमृता फडणवीस यांनी या प्रकरणाकडे सुरूवातीला दुर्लक्ष केलं. मात्र, तरीही आरोपी महिलेने आणि तिच्या वडिलांनी त्यांना फोन तसेच मॅसेज करणे सुरूच ठेवले.

इतकंच नाही तर त्यांनी अमृता फडणवीस यांना अप्रत्यक्षरीत्या धमकावून, कट रचून १ कोटींची लाच ऑफर करण्याचा केला प्रयत्न. दरम्यान, याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी मलबार हिल पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल होताच, पोलिसांनी अनिष्का नावाच्या महिलेसह तिच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीलाच एका महिलेने अप्रत्यक्षरित्या धमकावल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: प्रवीण गोयल आणि आई पूजा गोयल यांची १२ तास चौकशी

Ratnagiri Tourism : कोकणातील खास आकर्षण; पावसाळ्यात आवर्जून फिरा रत्नागिरीतील 'हे' २ समुद्रकिनारे

गुगलवर हत्येचे पर्याय शोधले, लोहगडवरून ढकलण्याचा सराव केला; केतन अग्रवाल खून प्रकरणाचा थरारक उलगडा

TET Exam Update : आज होणारी TET परीक्षा पुढे ढकलली, दिल्ली कनेक्शन आणि दीड कोटींचा व्यवहार; मोठी अपडेट समोर

भयंकर! ७ वर्षांची मुलगी शेजारी झोपलेली असतानाच पत्नीचा गळा चिरून खून; नंतर पतीने मेट्रोसमोर उडी मारून संपवलं आयुष्य

SCROLL FOR NEXT