Mantralay Saam TV
मुंबई/पुणे

VIDEO: प्रेयसीवर अत्याचार झाला, मात्र कोणतीही कारवाई झाली नाही; तरुणाचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न

पोलिसांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी या तरुणाला सुखरुप बाहेर काढलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मंत्रालायत एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्याने मंत्रालयात येऊन हे टोकाचं पाऊल उचललं त्याला कारणही तितकच गंभीर आहेत. प्रेयसीवर बलात्कार झाल्यानंतर आरोपींवर कोणतीही कारवाई झाली नाही. म्हणून तरुणाने तणावातून हे पाऊल उचललं.

सगळा प्रकार घडत असताना हा तरुण शेतकरी असल्याचा अंदाज लावला जात होता. काही वेळात संपूर्ण प्रकरण स्पष्ट झालं. (Latest News Update)

प्रेयसीवर अत्याचार झाला. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. अनेक तक्रार करुनही न्याय मिळाला नाही. म्हणून तरुणाने मंत्रालयात येत पाचव्या माळ्यावरून उडी घेतली. याआधी चार वेळा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. मात्र कोणतीही कारवाई झाली नाही, असं तरुणांच म्हणणं आहे.

मंत्रालयात हा प्रकार घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित होते. मंत्रालयाला लावलेल्या संरक्षण जाळ्यांमुळे या तरुणाचा जीव वाचला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

SCROLL FOR NEXT