devendra fadanvis ajit pawar Saam TV
मुंबई/पुणे

Devendra Fadnavis: दादांच्या विकासाची पंचसूत्री म्हणजे जुन्या योजनांची नव्याने घोषणा - फडणवीस

दोन अर्थसंकल्पांमध्ये केलेल्या घोषणा यावेळी देखील देत आहात. ही थिम चांगली आहे चांगली क्षेत्र आहेत घोषणा मात्र जुन्याच आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अर्थसंकल्पावरती (Budget2022) विधानसभेत भाषण केलं यावेळी त्यांनी राज्य सरकारव टीका करत हा अर्थसंकल्पामध्ये केंद्राचा आधार घेतला आहे तसंच या जुन्याच योजना असल्याचं ते म्हणाले. अर्थमंत्र्यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ट्रिलियन डॉलर करण्याची घोषणा केली, मात्र मी ती चार वर्षापूर्वी ही संकल्पना व्यक्त केली होती मात्र तेंव्हाच्या विरोधकांनी माझी खिल्ली उडवली होती, अस होऊ शकत नाही अस म्हणाले होते मात्र आज ते होत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

तसचं विकासाची पंचसूत्रीमध्ये मनुष्यबळ विकासाच्या अंतर्गत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा साधा उल्लेख नाही, राष्ट्रीय धोरणाशिवाय मनुष्यबळ विकासाची काम करता येतील का असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तसंच तुमची विकासाची पंचसुत्री म्हणजे जुन्या योजनांच रिपॅकेजिंग आहे. विकासाची पंचसुत्री कृषी, आरोग्य, दळणवळण, मनुष्यबळ विकास, उद्योग या क्षेत्रातील घोषणा जुन्याच आहेत दोन दोन अर्थसंकल्पांमध्ये केलेल्या घोषणा यावेळी देखील देत आहात. ही थिम चांगली आहे, क्षेत्रही चांगली आहेत मात्र घोषणा जुनीच, नवी नाही असं म्हणत त्यांनी अजित पवारांना (Ajit Pawar) टोला लगावला.

यावेळी ते म्हणाले, सरकारने मांडलेल्या या अर्थसंकल्पातील मूळ खर्च कळतच नाही. खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे अशा प्रकारची अवस्था या अर्थसंकल्पाची झाली आहे. या अर्थसंकल्पात किती विश्वास ठेवायचा अशी शंका येते. कर्जाचं प्रमाण वाढलं तरी त्या कर्जातून विकासात्मक खर्च किती होतो ते बघायला हवं. आपण पाहिलं तर कर्ज वाढलंच आहे. आधी महसुलाचा खर्च दाखवायता आणि नंतर पुरवठा आणि मागणी करायची. हा राज्यसरकारचा मनमानी कारभार चालू असल्याची टीकाही फडणवीसांनी यावेळी केली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोपानकाकांच्या पालखी सोहळ्यासाठी दोन अश्व सज्ज

पावसाळ्यात मिळणारी चमचमीत आणि औषधी तरोटा भाजी, एकदा तरी नक्की खा

8th Pay Commission : फिटमेंट फॅक्टर 3 टक्क्यांपेक्षा कमीच राहणार? आठव्या वेतनाबाबत आली मोठी अपडेट

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

SCROLL FOR NEXT