लोकशाहीचे रक्षक असाल तर अधिवेशनाचा कालावधी वाढवा- मुनगंटीवारांची मागणी Saam Tv
मुंबई/पुणे

लोकशाहीचे रक्षक असाल तर अधिवेशनाचा कालावधी वाढवा- मुनगंटीवारांची मागणी

भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची मागणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सभागृहामध्ये अनेक प्रश्नांवर चर्चा होऊ लागले आहेत. यामुळे लोकशाहीचे रक्षक असाल तर राज्याचे अधिवेशन एका आठवड्याने वाढवले पाहिजे, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार की, कमीत कमी एक आठवडा कालावधी वाढवला पाहिजे. कारण आमच्याकडे खूप कामकाज आहे.

या सभागृहाला योग्य आणि समर्पक न्याय द्यायचा असेल तर एक आठवडा हे अधिवेशन (Convention) वाढवतर पाहिजे, असे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी यावेळी सांगितले आहे. विधानसभा (Assembly) अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर (election) त्यांनी भाष्य केले आहे. त्यांनी त्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आम्ही विरोधी पक्ष बसणार आहोत. आणि त्यावर आमचा पुढील निर्णय घेणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.

हे देखील पहा-

राज्याचे (state) अर्थचक्र थांबले आहे. अर्थचक्र कोमात गेले आहे. आज राज्यामध्ये अनेक रोजंदारी कामगारांचे प्रश्न पंथय प्रमाणात आहेत. शेतकऱ्यांचे (farmers) प्रश्न आहेत. कोरोनाच्या (Corona) कालावधीमध्ये झालेला भ्रष्टाचार (Corruption) आहे. आरोग्य सेवेचे अपग्रेडेशन झाले नाही. मंत्रालय (Ministry) हा भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्या सापडत आहेत, असे अनेक विषय यामध्ये आहेत.

पेपरफुटीसारखे घाणेरडे पाप या राज्यामध्ये होत आहे. यामुळे जनतेच्या मनामध्ये आक्रोश आणि रोष निर्माण झाले आहे. त्यामुळे हे लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील. नाही तर नाही वाढवणार, असा हल्लाबोल देखील त्यांनी यावेळी केला आहे. नवीन निर्बंध लावण्याच्या अगोदर हाफकीन संस्था नवीन औषधे निर्माण करणार होती. आरोग्य भरती करण्यात येणार होती. या सर्व गोष्टीवषयी सरकार कुंभकर्णाच्या झोपेत असणार आहे तर गैर आहे. निर्बंध लादलेच पाहिजेत. पण त्याअगोदर उपाययोजना देखील केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tenant Rights : घर सोडताना घरमालक डिपॉझिटमधून पेंटिंगचे पैसे कापतोय? जाणून घ्या काय सांगतो कायदा

Shocking : शिक्षकी पेशाला काळिमा! स्पर्धा परीक्षा अकॅडमीत ३ विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार; शिक्षकाचं बिंग फुटलं

Woman Fitness Tips: पाठदुखी, थकवा आणि अशक्तपणा होईल दूर; महिलांनी रोजच्या सवयींमध्ये करा हे 8 बदल

Gold Rate Today: सोन्याच्या दरात सर्वात मोठा बदल, प्रतितोळा १२०० रूपयांनी भाव बदलला, वाचा ताजे दर

Maharashtra News Live Update: नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

SCROLL FOR NEXT