Pune: बर्थडे पार्टीला बोलावून इंजिनिअर तरुणीवर बलात्कार! कारण वाचून व्हाल थक्क SaamTv
मुंबई/पुणे

Pune: बर्थडे पार्टीला बोलावून इंजिनिअर तरुणीवर बलात्कार! कारण वाचून व्हाल थक्क

जीवनसाथी डॉट कॉमवरून ओळख करून इंजिनिअर तरुणीस लग्नाचे आमिष दाखविले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: जीवनसाथी डॉट कॉमवरून ओळख करून इंजिनिअर तरुणीला लग्नाचे (marriage) आमिष दाखविले होते. यानंतर इंजिनिअर (Engineer) तरुणाने तिच्याशी मैत्री करून बर्थडे पार्टीला (Birthday party) बोलावून तिच्यावर बलात्कार (sexual assualt ) केला आहे. भुमकर चौक, हिंजवडी (Hinjawadi) येथे नोव्हेंबर २०२१ मध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. निशांत हरीश चंदनानी (वय ३४, रा. रतलाम, मध्य प्रदेश) याच्याविरोधामध्ये पोलिसांनी (police) गुन्हा दाखल केला आहे. (Engineer girl sexual assualt for calling a birthday party)

हे देखील पहा-

याप्रकरणी ३२ वर्षीय पीडित तरुणीने सोमवारी (दि. २४) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी इंजिनिअर असून ती घटस्फोटित (Divorce) आहे. त्याचप्रमाणे आरोपी देखील इंजिनिअर असून घटस्फोटित आहे. दुसरे लग्न करण्याकरिता पीडित तरुणीने जीवनसाथी डॉट कॉम (Jeevansathi Matrimony) या वेबसाईटवर नाव नोंदणी केली होती. त्या वेबसाईटवरून आरोपीने पीडित तरुणीबरोबर ओळख केली होती. मी तुझ्याशी लग्न करणार आहे, असे सांगून आरोपीने पीडित फिर्यादी तरुणीशी मैत्री केली होती.

यानंतर आरोपीने त्याच्या वाढदिवसानिमित्त भुमकर चौक, हिंजवडी येथील त्याच्या राहत्या घरी आयोजित केलेल्या बर्थडे पार्टीकरिता पीडित तरुणीला बोलावले होते. रात्री उशिरा पार्टी संपली. तू एकटी तुझ्या घरी जाऊ नको, रात्र झाली आहे. उद्या सकाळी जा, असे म्हणून आरोपीने फिर्यादी तरुणीला त्याच्या भुमकर चौक येथील घरी थांबवून घेतले होते. त्यानंतर फिर्यादी बरोबर जबरदस्तीने शरीर संबंध केले होते. तसेच फिर्यादीच्या मनास लज्जा निर्माण करणारे कृत्य केले, असे फिर्यादीत नमूद आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कुडाळ रेल्वे स्थानकात रोटरी क्लबतर्फे २ हजार कापडी पिशव्यांचे वाटप

Political News : शिवसेना आमदाराच्या मुलाची रवानगी पोलीस कोठडीत; पाहा कोर्टात नेमकं काय घडलं?

Pune Fort : पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला! ४,६०३ फूट उंचीवर दिमाखात उभे आहे 'हे' ऐतिहासिक ठिकाण

Ladki Bahin Yojana : गणेशोत्सवात लाडक्या बहिणींना सरकारचं मोठं गिफ्ट; 'या' दिवशी खात्यात ₹१५०० जमा होण्याची शक्यता

Sugar Free Modak : ना शुगर ना मैदा! खजूर-अंजीरचे मोदक बनवा झटपट, डायबिटीज असणारेही आवडीने खातील

SCROLL FOR NEXT