Chief Election Commissioner Rajiv Kumar  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Election : आगामी निवडणुकीत राखीव मतदारसंघ आणि महिला मतदारांची संख्या किती? आयोगाने दिली महत्वाची माहिती, वाचा

Election commission PC Live : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी राज्य निवडणूक आयोगाला महत्वाच्या सूचना दिल्या.

Vishal Gangurde

मुंबई : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे. या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राजीव कुमार यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने महत्वाची सादर केली. यावेळी आयोगाने राज्यातील राखीव मतदारसंघाविषयी देखील माहिती दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. दुसरीकडे निवडणूक आयोग देखील निवडणुकीसाठी तयारी करत आहे. याच निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. तर यावेळी आलेल्या मुख्य निवडणूक आयुक्त यांनी राज्यातील मतदारांची आकडेवारी सादर केली.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील २८८ मतदारसंघापैकी खुले मतदारसंघ हे २३४ असणार आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी २५ मतदारसंघ राखीव ठेवण्यात आले आहेत. तर अनुसूचित जातीसाठी २९ मतदारसंघ राखीव ठेवण्यात आले आहेत. राज्यातल पुरुष मतदारसंघाची संख्या ४.९३ कोटी आहे. तर महिला मतदारांची संख्या ४.६० कोटी आहे.

तृतीयपंथीय मतदारसंघाची संख्या ५,७८० आहेत. ८५ वय आणि त्याहून अधिक असलेल्या मतदारांची संख्या ही १८ लाख ६७ हजार आहे. १०० वय आणि त्याहून अधिक असलेल्या मतदारांची संख्या ४९,०३४ इतकी आहे. राज्यातील नव मतदारांची संख्या ही १८ लाख ६७ हजार आहे. हे नवमतदार हे १८ ते १९ वर्ष वयोगटातील आहेत. मतदार नोंदणीसाठी ५.२५ लाख जणांनी अर्ज केले आहेत. यंदा निवडणुकीसाठी काम करणाऱ्या लोकांची संख्या ही १,१६,८७४ आहे.

दरम्यान, आज पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रातील कमी मतदान होणाऱ्या मतदारसंघाविषयी म्हटलं की, 'कुलाबा ,पुणे ,कल्याण येथे कमी प्रमाणात मतदान होतं. त्या ठिकाणी मतदान वाढवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. गडचिरोली भागात मदतन झाले. मात्र या भागात मतदान कमी झालं'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT