Eknath Shinde, Palghar Shiv Sena Saam TV
मुंबई/पुणे

जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख अन् आमदाराच्या पुत्रासह ७ नेत्यांची हाकलपट्टी; एकनाथ शिंदेंची मोठी कारवाई

Eknath Shinde: पालघर रेल्वे हॉस्पिटल कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी शिवसेनेने मोठी कारवाई केली आहे. जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शहरप्रमुख राहुल घरत आणि आमदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित यांच्यासह ७ जणांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

Namdeo Kumbhar

रूपेश पाटील, साम टीव्ही प्रतिनिधी

पालघर येथील रिलीफ (रेल्वे) हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पालघर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहेच. पण आता शिवसेना पक्षानेही संबंधित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हाप्रमुख कुंदन संखे, शहरप्रमुख राहुल घरत आणि पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांचे पुत्र रोहित गावित यांच्यासह एकूण सात जणांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ व्हायरल, शहरप्रमुखाला अटक

हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार घडल्यानंतर, शहरप्रमुख राहुल घरत यांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडिओच्या आधारे पालघर पोलिसांनी तातडीने कारवाई करत राहुल घरत यांना अटक केली आहे. या प्रकरणात कुंदन संखे आणि राहुल घरत यांच्यासह एकूण १७ जणांविरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या उर्वरित १६ जणांची पोलीस चौकशी सुरू असून, तपासानंतर त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

एकनाथ शिंदेंचा इशारा आणि कठोर कारवाई

या घटनेची गंभीर दखल घेत एकनाथ शिंदे यांनी कालच प्रसारमाध्यमांसमोर पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. "आम्ही अशा प्रकारच्या मारहाणीचे अजिबात समर्थन करत नाही आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल," असा इशारा त्यांनी दिला होता. त्यानंतर लगेचच पक्षाकडून जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख आणि आमदाराच्या पुत्रासह ७ पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

एकीकडे पोलिसांनी राहुल घरत यांना अटक करून इतर आरोपींचा तपास सुरू ठेवला आहे. तर दुसरीकडे पक्षाने थेट निलंबनाची कारवाई केल्यामुळे पालघरच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ढगांच्या गडगटासह मुंबई उपनगरात जोरदार पाऊस

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

Main Entrance Vastu Tips : घराच्या दरवाज्याजवळ चुकूनही 5 गोष्टी ठेवू नका; सकारात्मक ऊर्जा दूर राहील

Sangli Tourism : सांगलीत ५ विरंगुळ्याची ठिकाणे, पाऊल ठेवताच मन आपोआप होईल फ्रेश

तुकाराम मुंढेंचं आता थेट FDAमध्येच सर्जिकल स्ट्राइक; 15 अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT