Eknath Shinde Banner Saam Tv
मुंबई/पुणे

एकनाथ शिंदे भावी मुख्यमंत्री! ठाण्यातील 'त्या' बॅनरमुळे चर्चेला उधाण

आता एकनाथ शिंदे यांचा बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा केल्याने उल्लेख राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा ९ फेब्रुवारीला वाढदिवस आहे. त्यानिमित्त मुलुंडसह सर्व ठाण्यातील विविध भागात पोस्टर्स आणि बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्समध्ये एकनाथ शिंदे यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. या बॅनरमुळे आता चर्चाना उधाण आले आहे. (Eknath Shinde Latest News)

गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आजारी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्या कोणाकडे तरी या पदाचा कारभार सोपवावा अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यातच आता एकनाथ शिंदे यांचा बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा केल्याने उल्लेख राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील दिग्गज नेत्यांपैकी एक आहेत. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरु असताना शिवसेनेकडून एकनाथ शिंदे हेच नाव सगळ्यात आघाडीवर होते. परंतु, ऐनवेळी मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्याचा निर्णय झाला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाच्या या स्पर्धेतून बाहेर पडले. मात्र, ठाण्यातील बॅनर्समुळे पुन्हा एकदा नवीन चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dry Day : महाराष्ट्रात उद्या ड्राय डे! किती वाजेपर्यंत दुकाने बंद राहणार? वाचा

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील दीड लाख राजपत्रित अधिकारी देणार एक दिवसाचे वेतन

Leftover Chapati Storage Tips: रात्री उरलेल्या चपात्या फ्रिजमध्ये ठेवाव्या की नाही? शिळ्या होऊ नये म्हणून 5 सोप्या टिप्स वापरा

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

SCROLL FOR NEXT