एकनाथ शिंदे यांनी घेतली स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांची भेट वैदेही काणेकर
मुंबई/पुणे

एकनाथ शिंदे यांनी घेतली स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबियांची भेट

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई

पुणे - महाराष्ट्र सरकार एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी येथे दिली. ३१ जुलै अखेरपर्यंत १५,५०० हजार पदांची भरती करण्याची घोषणा सरकारने केली असून त्याबाबतची कार्यवाही सुरू देखील केली असल्याचे त्यांनी सांगितले. Cabinet Minister of Urban Development and Public Works Eknath Shinde meets the family of Swapnil Lonakar

हे देखील पहा -

एमपीएससीची परीक्षा mpsc exam उत्तीर्ण होऊनही नियुक्ती होत नसल्यामुळे नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्नील लोणकर swapnil lonkar या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी त्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांच्या सोबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि आमदार तानाजी सावंत उपस्थित होते. याप्रसंगी, एकनाथ शिंदे यांनी स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबियांना शिवसेनेच्या वतीने १० लाख रुपयांची मदत सुपुर्द केली. shivsena donate ten lack rupees to swapnil lonkars family याप्रसंगी एकनाथ शिंदे म्हणाले की, कोरोनाच्या संकटामुळे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. परंतु, राज्य सरकार संवेदनशील आहे. स्वप्नील लोणकरच्या दुर्दैवी आत्महत्येची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी गंभीर दखल घेऊन १५,५०० पदांची तातडीने भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्याच आठवड्यात झालेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विधानसभेत याबाबतचा निर्णय जाहीर केला असून याबाबतच्या कार्यवाहीला सुरुवात देखील केली आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यास राज्य सरकार कटिबद्ध आहे.याप्रसंगी, स्वप्नील लोणकरचे वडील सुनिल लोणकर, आई छाया लोणकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देशमुख, रमेश कोंडे, युवा सेनेचे महाराष्ट्र सहसचिव किरण साळी, उपाध्यक्ष आकाश शिंदे व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT