Eknath Shinde Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांचं नेतेपद काढलं

शिवसेनेने आज तातडीने राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक दुपारी शिवसेना भवन येथे बोलावली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राज्यातील राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेनं एक मोठा निर्णय घेतला आहे. आज शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारणी बैठक झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं नेतेपद काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जवळपास ४० हून अधिक आमदारांसह बंड केल्याने शिवसेना (Shivsena) अडचणीत सापडली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक आवाहन केल्यानंतर शिंदे यांनी बंड सुरूच ठेवलं आहे. अशातच शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेने आज तातडीने राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक दुपारी शिवसेना भवन येथे बोलावली होती.

या बैठकीत एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांचे राष्ट्रीय कार्यकारणी समितीतून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. (Eknath Shinde Latest News)

बाळासाहेबांचं नाव वापरायला शिवसेनेचा विरोध

शिवसेनेनं शिंदे गटाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव वापरायला विरोध केला आहे. शिवसेनेच्या बैठकीत हा निर्णय झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Eknath Shinde Latest News)

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश शिवसेनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना देण्यात आले होते. या बैठकीत एकनाथ शिंदे यांची राष्ट्रीय कार्यकारणीतून हकालपट्टी करण्याचा ठराव मांडला असल्याचे बोलले जात आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, लीलाधर डाके, रामदास कदम, संजय राऊत, सुधीर जोशी, अनंत गीते, एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे आणि आनंदराव अडसूळ यांचा समावेश होता.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने २०१८ मध्ये पक्षप्रमुख पदी उद्धव ठाकरे यांची निवड केली. त्यानंतर वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनाच अध्यक्षपदी निवडण्यात आले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यामुळे त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारणी सदस्यपदावर आता गदा आली आहे. तसेच सुधीर जोशी यांच्या निधनामुळे राष्ट्रीय कार्यकारणीतील एक जागा रिक्त झाली आहे. (Eknath Shinde Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डोंबिवली रेल्वे स्थानकातून राजू पाटील शेकडो मनसैनिकांसह ट्रेनने मुंबईकडे रवाना

मोदी सरकारचं गिफ्ट! ५ टक्के व्याजावर ३ लाखांचं कर्ज; काय आहे सरकारची योजना, कोण घेऊ शकतो लाभ?

Gold Price Today : सोन्याच्या दरात सर्वात मोठा बदल; 18, 22 आणि 24 कॅरेट किती रुपयांनी स्वस्त? आताच घ्या जाणून

'दृश्यम' चित्रपट पाहिला, २००० किमी प्रवास केला अन्…; बापाला संपवल्याचा रचला बनाव, पण एका कॉलने सगळा प्लॅन उधळला

BJP: भाजपला मोठा झटका! दिग्गज महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT