Uddhav Thackeray Saam Tv
मुंबई/पुणे

आपल्या राजाला साथ द्या! एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर एका शिवसेना आमदाराचे ठाकरेंच्या फोटोसह ट्विट

एकनाथ शिंदे यांनी ३३ आमदारांसह बंड केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३३ शिवसेनेचे आमदार गुवाहटीमध्ये गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता शिवसेनेत खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकवरुन संवाद साधला. यावेळी ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घातली.

आमदार संतोष बांगर यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरेंना पाठिंबा दर्शवला आहे. 'आपल्या राजाला साथ द्या...!!' अस ट्विट संतोष बांगर यांनी केले आहे.

(Uddhav Thackeray) म्हणाले.

या ट्विटमध्ये बांगर यांनी १३ फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये स्व.बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. या फोटोत मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे आहेत.

...तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास तयार

शिवसेनेचे (Shivsena) ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३३ शिवसेना आमदार गुवाहटीमध्ये गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेत खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकवरुन संवाद साधला. बंड केलेल्या आमदारांनी मला समोर येऊन सांगा, मी मुख्यमंत्री पद सोडायला तयार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, हिंदुत्व सोडल्याची चर्चा सुरू आहेत, अस मी काय केले आहे की मी हिंदुत्वापासून बाजूला गेलो आहे. गेल्या अडीच वर्षापासून मुख्यमंत्री पदावर आहे. आता माझ्यासोबत मंत्रिमंडळात आहेत ते बाळासाहेब यांच्यासोबत असणारेच शिवसैनिक आहेत. मला कशाचाही अनुभव नसताना जबाबदारी जिद्दीने पार पाडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यात ड्रग्जचा मोठा कारखाना सुरू करण्याचा कट उधळला; सव्वा कोटींच्या मुद्देमालासह ८ जणांना अटक

Jalna Tourism : इतिहासातील महत्त्वाचे पान! प्राचीन लेण्यांनी सजलेला जालनामधील 'हा' किल्ला, उन्हाळी सुट्टीत करा भटकंती

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश देशमुख मालामाल; दुसऱ्या रविवारी 'राजा शिवाजी' ने बनवला 'हा' मोठा रेकॉर्ड, एकूण कमाई किती?

Dhokla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी बनवा स्पाँजी आणि चविष्ट ढोकळा चटणी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT