Eknath shinde Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळचा विस्तार लांबणीवर?

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अजुनही झालेला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केले, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे गट भाजप एकत्र येत सत्ता स्थापन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री पदाची देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे. अजुनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. राष्ट्रपती निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे बोलले जात होते. शिवसेनेने व्हिपच्या विरोधात काम केल्याल्या आंमदारांवर कारवाई व्हावी अशा मागण्याची याचिका सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल केली आहे. यावर आज सुनावणी झाली.

शिवसेनेच्या याचिकांवर आज सुनावणी झाली. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला तर दुसरीकडे शिंदे गटाच्या वतीने वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. शिंदे गटाकडून वेळ वाढवून मागण्यात आला होता. सुप्रीम कोर्टाने पुढची सुनावणी १ ऑगस्टला होणार असल्याचे सांगितले आहे, तर आता जी परिस्थिती आहे तशीच पुढील सुनावणी पर्यंत राहुदे असं म्हटले आहे. (Shivsena Latest News) यावरुन आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार की नाही अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत. या पार्श्वभूमिवर काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी ट्विट करुन टीका केली आहे.

'माननीय सर्वोच्च न्यायालयाने जैसे थे सांगितलेले आहे, त्यामुळे आता दोनच लोकांचे मंत्रिमंडळ राहणार मंत्रिमंडळ विस्तार करता येणार नाही, असं ट्विट अतुल लोंढे यांनी केले आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार की नाही अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपकडून मंत्रिमंडळ विस्तार हा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर होणार असं सांगण्यात येत होते, पण आता कोर्टाच्या या निर्णयामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे ढकलला जाणार का हे पाहण् महत्वाचे ठरणार आहे.

सुप्रीम कोर्टात काय झाले?

याचिकांवर आज सुनावणी झाली. उद्धव ठाकरे गटाच्या वतीने वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला तर दुसरीकडे शिंदे गटाच्या वतीने वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. शिंदे गटाकडून वेळ वाढवून मागण्यात आला होता, आता पुढची सुनावणी १ ऑगस्टला होणार आहे. (Shivsena Latest News)

हरिश साळवे यांच्याकडून सुप्रीम कोर्टात (Supreme Court) वेळ मागण्यात आली. कागदपत्रे सादर करण्यासाठी एक आठवड़्याचा वेळ असे सांगितले आहे. त्यावर सुप्रीम कोर्ट आता काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

साळवे यांनी केलेल्या मागणीला कपील सिब्बल यांनी विरोध दर्शविला. कपील सिब्बल हे सध्या युक्तीवाद करीत आहे. सुप्रीम कोर्ट (Supreme Court) सुध्दा याबाबत सकारात्मक असल्याची माहिती मिळत आहे. अल्पमतात असलेला नेता गटनेत्याचा काढू शकतो का असा प्रश्न कोर्टाने विचारला आहे. वेळ वाढवून देण्यात काही अडचण नसल्याचं दिसतंय. या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लागावा अशी मागणी कपील सिब्बल यांनी केली. (Uddhav Thackeray Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

SCROLL FOR NEXT