cm Eknath Shinde and Sanjay Raut  Saam Tv
मुंबई/पुणे

संजय राऊतांच्या सत्तांतराच्या वक्तव्यावर एकनाथ शिंदेंच प्रत्युत्तर, म्हणाले...

खासदार संजय राऊत यांनी राज्यात पुन्हा सत्तांत्तर होऊ शकते असे सूचक विधान केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात पुन्हा सत्तांतर झाले तर आश्चर्य वाटून घेऊ नका, असं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळी केले होते. या विधानानंतर राज्यात पुन्हा सत्तांत्तर होणार का, शिंदे - फडणवीस सरकार कोसळणार अशा चर्चा सुरू झाल्या. राऊत यांच्या विधानावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांना त्यांच्या स्वप्नात राहू द्या, आम्हाला १६० आमदारांचा पाठींबा आहे. गटनेते, प्रतोद आमचा झाला आहे. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार ही होईल. लोकसभेतही १२ खासदारांनी अध्यक्षांना पत्र दिले आहे. दोन्ही सभागृहात आमच्याकडे बहुमत असून सरकार मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे त्यांना स्वप्न पाहू द्या”.अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली.

एकनाथ शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लिलाधर डाके यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मी आज शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची सदिच्छा भेट घेतली. प्रतिकूल परिस्थितीत शिवसेना वाढवण्याचे काम लिलाधर डाकेंनी केले आहे. त्यांनी स्वत:साठी काहीही केले नाही जे केले ते शिवसेनेसाठी केले, असंही शिंदे(Eknath Shinde) म्हणाले.

पुन्हा सत्ता परिवर्तन? संजय राऊतांचे सूचक वक्तव्य

राज्यात सत्तांतर होऊन तब्बल २६ दिवस झाले. शिंद-फडणवीस सरकारचा अजुनही विस्तार झालेला नाही. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यावरुन आता संजय राऊत यांनी टोला लगावत सूचक वक्तव्य केले. 'महाराष्ट्रात पुन्हा सत्ता परिवर्तन झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका, असं सूचक वक्तव्य आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले. शिंदे गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले. (Sanjay Raut Latest News)

संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्र्यांना एका महिन्यात पाचवेळा दिल्लीत यावे लागते. राज्यात पूरपरिस्थीती आहे. फक्त दोघांचेच कॅबिनेट सुरु आहे. या गटाने आता महाराष्ट्राला काय दिले. कोणत्याही परिस्थितीत सर्वाच्च न्यायालयामध्ये संविधानाच्या विरोधात निकाल देणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे, असा विश्वासही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raanbhaji Recipe : पावसाळ्यात आवर्जून खा 'ही' रानभाजी; सर्व आजार जातील पळून, फायदे एकदा वाचाच

Maharashtra News Live Update: पुणे जिल्हा सत्र न्यायालयात आज नसरापूर प्रकरणाचा निकाल

Gold Rate Today : सोने चांदीचे दर घसरले! तब्बल २७,००० रुपयांनी सोनं स्वस्त; चांदीचा भाव काय? जाणून घ्या ताजे दर

High blood pressure: तरुण वयातच वाढतोय रक्तदाब? डॉक्टरांनी सांगितलं रोजच्या सवयींमधील सर्वात मोठं कारण

पहिला पाऊस पडल्यानंतर शेतकरी आनंदी का होतो? |why farmers are happy after rain

SCROLL FOR NEXT