Nana Patole  Saam TV
मुंबई/पुणे

आमचं सरकार पाच वर्ष चालेल; नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी ४२ आमदारांसह बंड केले आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरळ ढवळून निघाले. महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. शिवसेनेच्या संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांनी २४ तासात परत यावे, त्यांच्या मागण्यांचा विचार केला जाईल, असे सूचक वक्तव्य केले आहे, यावरुन आता महाविकास आघाडीतील नेत्यांकडून प्रतिक्रीया येत आहेत.

संजय राऊत यांच्या प्रतिक्रीयेवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे चालणार आहे. काँग्रेस (Congress) पाठिंबा देणार आहे. काँग्रेस महाविकास आघाडीसोबत राहणार आहे.

भाजपकडे (BJP)अजुनही सत्तेसाठी बहुमताचा आकडा झालेला नाही. भाजप राज्याचे नूकसान करत आहे. आकडे अजुनही उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे. महाराष्ट्रात जर अल्पमतात सरकार आहे, तर भाजपने तसा दावा केला आहे.

भाजप ही अस्थिरता निर्माण करत आहे. संजय राऊत यांचे वक्तव्य हे शिवसेनेतील अंतर्गत मुद्दा आहे. महाविकास आघाडीसोबत काँग्रेस आहे. भाजप अजुनही शांत का आहे, कारण त्यांच्याकडे अजुनही संख्याबळ नाही, असंही नाना पटोले (Nana Patole)म्हणाले.

वेळ पडली तर आम्ही शिवसेनेला महाविकास आघाडीमध्ये बाहेरुन पाठिंबा देऊ, असंही नाना पटोले म्हणाले. जर वेगळ काही घडले तर आम्ही विरोधी बाकावर बसायला तयार असल्याचे पटोले म्हणाले.

हे देखील पाहा

शिंदे गट उद्या राज्यपालांना आमदारांच्या सह्यांचे पत्र देणार

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गट उद्या शुक्रवारी आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यपालांना पाठवणार आहेत. या पत्रात ४२ आमदारांच्या सह्या असणार आहेत. आज आणखी काही आमदार येणार असल्याने त्यांच्या सऱ्ह्या घेऊन पत्र पाठवणार असल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४२ आमदारांसह बंड केल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. एकनाथ शिंदे गट उद्या राज्यपाल यांना पत्र देणार असल्याचे बोलले जात आहे.

Edited By-Santos Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Latest New Mangalsutra Designs For Women: नवीन मंगळसूत्र घ्यायचंय? सध्या ट्रेंडमध्ये आहेत 5 डिझाईन्स

एक इंचही मागे हटणार नाही; MPSC विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींचं फडणवीस सरकारला चॅलेंज, VIDEO

ड्रग्ज सेवनामुळे एकाचा मृत्यू, शौचालयात ड्रग्जची डर्टी पार्टी

Cashews Vs Almonds: काजू आणि बदाम, आरोग्यासाठी कोणतं ड्रायफ्रुट्स फायदेशीर?

Maharashtra News Live Update: पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर नामनिर्देशन पत्र दाखल

SCROLL FOR NEXT