Eknath Shinde Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! शिवसेनेच्या १२ खासदारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट

शिवसेनेच्या १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे गट आणि भाजप एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्रीपदाची एकनाथ शिंदे यांनी तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आता शिवसेनेचे (Shivsena) राज्यभरातील नेत्यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. आता शिवसेनेच्या १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शिवसेनेच्या (Shivsena) १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यामुळे आता या बारा खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच हा खासदारांचा स्वतंत्र गट स्थापन केला जाणार असून, या संदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शिवसेनेच्या १२ खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्याचे पत्र दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत आहेत. शिंदे गटात शिवसेनेचे १२ खासदार सामील होणार आहेत. काही दिवसापूर्वी शिवसेनेच्या खासदारांची दिल्लीत अमित शाहांच्या सोबत बैठक झाली होती.

या खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट

राहुल शेवाळे, धैर्यशील माने, सदाशिव लोखंडे, श्रीकांत शिंदे, हेमंत पाटील, संजय मंडलिक, राजेंद्र गावित, प्रताप जाधव, भावना गवळी, हेमंत गोडसे, कृपाल तुमाने, श्रीरंग बारणे या खासदारांनी मुख्यमंत्री शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे.

रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर केले आरोप

रामदास कदम म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या आजुबाजूला असणाऱ्या लोकांच्यामुळे शिवसेनेवर सध्या ही परिस्थिती आली आहे. अनिल परब यांच्यामुळे सेनेवर ही वेळ आली आहे. उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा राष्ट्रवादीला (NCP) सोडले पाहिजे. महाविकास आघाडी पाच वर्ष टीकली असती तर शिवसेना संपली असती. एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेना टीकली आहे. आमचे शिवसेनेसाठी योगदान आहे, ५० वर्ष आम्ही शिवसेनेसाठी घालवली आहेत, असंही कदम म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यावर अवकाळीचे सावट; 17 ते 20 मार्चदरम्यान पावसाचा अंदाज

Eye Care: चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे? मग डॉक्टरांनी सांगितलेले 'हे' ७ फळ ठरतील वरदान

Rice health benefits: रात्री भात खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं का? हा समज की गैरसमज?

Saree Tips : फक्त ५ मिनिटांत चापूनचोपून साडी नेसाल; 'ही' स्मार्ट ट्रिक वापरा, समारंभात मस्त मिरवा

Sanjay Dutt : सोनं, लाखोंचं घड्याळ अन् बरंच काही; संजय दत्तला पाकिस्तानी चाहत्याकडून महागड्या भेटवस्तू

SCROLL FOR NEXT